शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Santosh Bangar on Sanjay Raut: जिथे मिळेल तिथे संजय राऊत यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही; शिंदे गटाच्या आमदारांची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 11:52 IST

Santosh Bangar on Sanjay Raut: संजय राऊत यांनी पाच महिन्यांपूर्वी चाळीस रेडे कामाख्या देवीला बळी देणार असल्याचे वक्तव्य केले होते. 

बोम्मई मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कानशिलात लगावतात आणि शिंदे चोळत बसतात, असा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला होता. यावर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. 

संजय राऊत हा पागल झालेला, पिसाळलेला कुत्रा आहे, त्याच्या कानशिलात वाजविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ते ज्या प्रकारे वक्तव्ये करत आहेत, जिथे मिळेल तिथे संजय राऊत यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत बांगर यांनी टीका केली. यावेळी टीका करताना बांगर यांची जीभ घसरली. संजय राऊत यांनी पाच महिन्यांपूर्वी चाळीस रेडे कामाख्या देवीला बळी देणार असल्याचे वक्तव्य केले होते. 

अमित शहा यांनी एकनाथ शिंदे आणि बोम्मईंना एकाच खोलीत बंद करावे तरच सीमाप्रश्नावर तोडगा सापडेल, असे पृश्वीराज चव्हाणांनी म्हटले होते. यावरही संतोष बांगर यांनी या लोकांना दुसरा काही काम उरलेले नाही. कुठली जागाच उरलेली नाही, त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असे म्हटले. ग्राम पंचायत निवडणुकीत दोन्ही बाजू आपणच आघाडीवर असल्याचे सांगत आहेत, त्यावर ग्राम पंचायतमध्ये मिडीयाने दाखविले आहे कोण पुढे आहे. त्यामुळे जनतेला विरोधकांच्या दाव्याचा काही फरक पडणार नाही, असे उत्तर दिले. 

संजय राऊत आज काय म्हणालेले...खासदार संजय राऊत यांनीही याच प्रकरणावरुन शिंदे आणि फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तुम्ही कितीही रंग सफेदी कराल? भूखंड घोटाळा अतिशय गंभीर आहे तरीसुद्धा तुम्ही नाक वर करुन बोलत आहात. मला एक कळत नाही फडणवीस भ्रष्टाचाराच्या पाठिशी कशाला उभं राहत आहेत? "तुमचा निर्णय जर योग्य होता मग हायकोर्टानं स्थगिती का दिली याचं उत्तर द्या. बाकीचं काही सांगत बसू नका. तुम्ही किती रंग सफेदी कराल? घोटाळा झाला आहे आणि फडणवीस भ्रष्टाचाऱ्यांना का पाठिशी घालत आहेत? यात काय त्यांनाही वाटणी मिळालीय का? मांजर- बोक्याची वाटणी झाली आहे का?", असं संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदे