शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut : "मला अटक करा, फाशी द्या, गोळ्या घाला... मैं झुकेगा नहीं साला"; संजय राऊतांचं रोखठोक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 14:09 IST

Sanjay Raut And Deepak Kesarkar : संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केलं आहे.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे शिंदे गटावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यांना शिंदे गटाचे आमदार, नेते आणि प्रवक्तेही प्रत्युत्तर देतात. नुकतेच मंत्री दीपक केसरकर यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना, संजय राऊतांना पुन्हा तुरुंगात जायचंय का? असा प्रतिप्रश्न केला होता. त्यावर, आता संजय राऊत यांनी केसरकरांना थेट इशारा दिला 2024 ला केसरकरांनीच तुरुंगात जायची तयारी ठेवावी, असे राऊत यांनी म्हटले. यानंतर आता राऊतांनी रोखठोक ट्विट केलं आहे. "मला अटक करा, मला फाशी द्या किंवा मला गोळ्या घाला, मी पुन्हा सांगतो, मैं झुकेगा नहीं साला!" असं म्हटलं आहे. 

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केलं आहे. "शिंदे गँगच्या दीपक केसरकरांकडून मला धमकी देण्यात येत आहे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे या धमक्यांकडे लक्ष देतील अशी आशा आहे. मिस्टर केसरकर, मला अटक करा, मला फाशी द्या किंवा मला गोळ्या घाला... मी पुन्हा सांगतोय, मैं झुकेगा नहीं साला!" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

"संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात टाकण्याची धमकी शिंदे गटाचे मंत्री  केसरकर यांनी दिली. याचा अर्थ काय? न्याय व कायदा तुमच्या कोठीवर नाचत आहे? खोके देऊन त्यांना गुलाम केलें आहे? हुकूशाहीचा अंत होईल. तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही. खून करा नाहीतर तुरुंगात टाका" असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

संजय राऊतांना पुन्हा तुरुंगात जायचंय का? यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रासाठी आणि पक्षासाठी तुरूंगात जाऊ, आम्ही तुमच्यासारखे पळपुटे नाहीत, तुमच्यासारखे लफंगे नाहीत. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही, तुम्ही म्हणजे कायदा नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी दीपक केसरकरांवर पलटवार केला. तसेच, केसरकर खरंच असं बोलले असतील तर 2024 ला त्यांनी तुरुंगात जायची तयारी ठेवावी, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येत आहेत, त्याबद्दल संजय राऊत यांना विचारल असता, योगी मुंबईत येत आहेत, त्यांचे स्वागत आहे. पण त्यांनी गुजरातमध्ये सुद्धा जावं, असेही त्यांनी म्हटलं.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDeepak Kesarkarदीपक केसरकर Amit Shahअमित शाह