शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

Sanjay Raut: संजय राऊतांनी घेतले देवेंद्र फडणवीसांचे नाव, त्यांचा फ्रंटमॅन कोण? मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 17:24 IST

Sanjay Raut Press Conference Devendra Fadanvis: काही दिवसांपूर्वी भाजपाचे काही प्रमुख लोक मला भेटले त्यांना मी ओळखतो. त्यांनी मला वारंवार या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा, असे सांगण्याचा प्रयत्न केला. आमची पूर्ण तयारी झालेली आहे. राष्ट्रपती राजवट आणायची आहे. हे सरकार घालवायचे आहे, असे सांगितल्याचे राऊत म्हणाले.

उद्या भाजपाचे साडेतीन नेते आत जातील असा इशारा देत संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. हे साडेतीन नेते कोण असा सवाल राज्यातील लोकांना पडलेला असताना संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटच्या क्षणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. 

फडणवीस यांचा एक फ्रंटमॅन आहे, मोहित कंबोज, असा आरोप संजय राऊत यांनी करताना या कंबोज यांनी पीएमसी बँकेतील घोटाळ्याचे पैसे जमिनी खरेदी, प्रकल्प उभारण्यासाठी वापरल्याचे म्हटले आहे. तसेच हा कंबोज एकदिवस देवेंद्र फडणवीसांना बुडविणार असल्याचा गौप्यस्फोटही केला आहे. 

मोहित कंबोज यांनी १२ हजार कोटींची जमीन केवळ १०० कोटींना विकत घेतली आहे. त्या जमिनीवर त्याचा प्रकल्प सुरु आहे. यात पीएनबीचे पैसे गुंतलेले आहेत. ही जमिन एवढ्या कमी पैशांना कशी मिळाली याचा इतिहास मी तुम्हाला देणार आहे. किती कंपन्या स्थापन केल्या, त्याची माहिती देणार आहे. हे कसे झाले हे देवेंद्र फडणवीसांना चांगले माहिती आहे. त्यांनीच याचे उत्तर द्यावे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

काही दिवसांपूर्वी भाजपाचे काही प्रमुख लोक मला भेटले त्यांना मी ओळखतो. त्यांनी मला वारंवार या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा, असे सांगण्याचा प्रयत्न केला. आमची पूर्ण तयारी झालेली आहे. राष्ट्रपती राजवट आणायची आहे. हे सरकार घालवायचे आहे. काही आमदार हाताशी लागले आहेत. जर तुम्ही बधला नाहीत तर केंद्रीय यंत्रणा तुमच्या लोकांना टाईट करण्यासाठी तयार आहेत. यावर मी म्हणालो, हरकत नाही तुम्ही काहीही करू शकता, असे मी त्यांना म्हणालो, असे राऊत यांनी सांगितले. त्यानंतर तीन दिवसांत माझ्या नातेवाईक, मित्रांवर ईडीच्या धाडी पडू लागल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा