शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जागावाटपाबाबत संजय राऊत स्पष्टच बोलले; "आमचा १९ आकडा कायम राहील, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 11:00 IST

विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून दबाव टाकला जातो. आम्ही लढाई लढत आहोत असं राऊत म्हणाले.

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे. परंतु अद्याप जागावाटपाचा कुठलाही फॉर्म्युला ठरला नाही. लवकरच प्रमुख नेत्यांची बैठक होईल. त्यात जागावाटपाची चर्चा होईल. आमचा १९ चा आकडा कायम आहे. आम्ही या जागा जिंकलेल्या आहेत असा खुलासा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. 

संजय राऊत म्हणाले की, लोकसभेच्या १९ जागा जिंकून आम्ही आलो आहोत. त्यातील काही सोडून गेले पण जागावाटप करताना तिन्ही पक्षात समन्वय साधताना काहीठिकाणी तडजोडी कराव्या लागतील, तोडगा काढावा लागतील हे सत्य आहे. तडजोडीचा फायदा भाजपाला मिळणार नाही. महाविकास आघाडी मजबूत आहे. १९ आकडा कायम राहील. महाराष्ट्रात शिवसेना १९ आकडा कायम ठेवेल, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. प्रमुख नेत्यांची बैठक होईल त्यात निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं. 

निवडणुका घेण्यास टाळाटाळ का? मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेण्यासाठी टाळाटाळ का करताय? मुंबई, ठाण्यासह १४ महापालिका निवडणुका घ्या, मोदींना प्रचाराला आणा, कुणालाही प्रचाराला आणावे, निवडणुका घ्या, जनमत कुणाच्या बाजूने आहे हे कळेल असा इशाराही राऊतांनी भाजपाला दिला आहे. 

आम्ही यादी तयार करत आहोत...विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून दबाव टाकला जातो. आम्ही लढाई लढत आहोत. जयंत पाटील खंबीरपणे तपासाला सामोरे जातायेत. राजकीय दबावाचे हे षडयंत्र आहे. काही गोष्टी आम्ही करत नाही, मान्य करत नाही त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून गुडघे टेकवायला लावतात. पण आम्ही ते करत नाही. २०२४ नंतर ईडीच्या कारवाईला कुणाला पाठवायचे आणि किती तास बसवायचे याची यादी आम्ही तयार करत आहोत असंही संजय राऊत म्हणाले. 

आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री, मग चुकीचं काय?नागपूर दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लावलेत त्यावर पत्रकारांनी संजय राऊतांना प्रश्न विचारला तेव्हा लोकांच्या भावना असतील तर भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले त्यात चुकीचे काय? लोकांनी प्रेमाने हे बॅनर लावलेत त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही असं विधान केले. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSanjay Rautसंजय राऊतAaditya Thackerayआदित्य ठाकरे