शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: "...तर त्याच पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल", संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 13:02 IST

Sanjay Raut: ''आमची हत्यारे तयार, दोन घाव बसले तर समोरचा पाणी मागणार नाही.''

मुंबई: हनुमान चालीसा आणि मशिदीवरील भोग्यांमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. या मुद्द्यावरुन भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, शिवसेना नेते सजंय राऊत(Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका करण्यात आली आहे. भाजप जाती, धर्माच्या नावावर राज्यातील वातावरण खराब करत असल्याची टीका राऊतांनी केली.

'...तर त्यांनाही पाण्यात बुडवावं लागेल'संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "आतापर्यंत आम्हाला सत्ता किंवा सरकार असल्यामुळे काही बाबतीत संयम आम्ही बाळगला. पण जर पाणी डोक्यावरून जाणार असेल, तर त्याच पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल,'' असं संजय राऊत म्हणाले. तसेच, ''काही राजकीय पक्ष हे जाती, धर्माच्या नावावर महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत,'' असंही ते म्हणाले.

'दोन घाव बसले तर...'''शिवसेना कधीही समोरुन वार करते आणि छातीवर वार झेलते. आम्हाला लढण्याचं प्रशिक्षण देण्याची गरज नाही, लढण्यासाठी आम्हाला भाडोत्री लोक देखील लागत नाहीत. आम्ही दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून लढत नाही. आमची हत्यारं आमचीच आहेत आणि ती धारंधार आहेत, दोन घाव बसले तर समोरचा पाणी मागणार नाही,'' असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

'राज्याच्या बदनामीचा कट'ते पुढे म्हणतात की, ''जशास तसं उत्तर देणं शिवसेनेचा स्वभाव आहे. आम्हाला त्याचं बाळकडूचं मिळालं आहे. शिवसेनेच्या बदनामीचा आणि खास करून महाराष्ट्राच्या बदनामीचा एक व्यापक कट काही असमाजिक संघटना, तत्व या ठिकाणी एकत्र येऊन सुरू केलेला आहे. अनेक माध्यमातून त्यांना महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करायची आहे. या सगळ्याला उत्तर देणं गरजेचं आहे, असं पक्ष प्रमुखांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला शिवसेना सामोरे जाण्यासाठी तयार आहे," असही राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा