शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांना 'स्टेपनी' म्हणाले संजय राऊत आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 16:51 IST

लाेकमतच्या पत्रकारिता पुरस्कार साेहळ्यात खासदार संजय राऊत यांनी राेखठाेक मुलाखत दिली.

पुणे : लाेकमत पत्रकारिता पुरस्कार साेहळ्यामधील खासदार संजय राऊत यांच्या मुलाखतीमध्ये  त्यांनी राेखठाेक उत्तरे दिली. त्यांंना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या सरकारबाबत विचारले असता ''हा फुसका बार ठरणार असल्याची मला खात्री हाेती. भाजप आमची स्टेपनी घेऊन गेले हाेते'' असे राऊत अजित पवारांबाबत बाेलताच सभागृहात एकच हशा पिकला.'' परंतु स्टेपनी सुद्धा महत्त्वाचा भाग असल्याचेही '' राऊत यावेळी म्हणाले. 

पुण्यातील पत्रकारांचा सन्मान लाेकमत पत्रकारिता पुरस्कारातून करण्यात आला. टिळक स्मारक रंगमंदिरात रंगलेल्या या साेहळ्यात खासदार संजय राऊत यांची मुलाखत विशेष रंगली. या मुलाखतीत राऊत यांना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्याचे समाेर आल्यानंतर राऊत यांची प्रतिक्रीया विचारली असता  ''मला काही वाटले नाही. हा फुसका बार असणार हे मला माहीत हाेते'' अशी प्रतिक्रीया राऊत यांनी दिली. तसेच ''आम्हाला ही तिसरा डाेळा आहे त्यातून आमचे लक्ष हाेते'' असेही ते यावेळी म्हणाले. 

अजित पवार यांना स्टेपनीची उपमा देत ते म्हणाले, ''आमच्या गाडीचा नटबाेल्ट ढिला करायचा प्रयत्न हाेईल असे माहित हाेते. पण गाडी आमची घसरणार नाही याची खात्री हाेती. आमची चाके शाबूद हाेती. ते आमची स्टेपनी घेऊन गेले हाेते. स्टेपनी सुद्धा गाडीचा महत्त्वाचा भाग असताे. अजित पवार महत्तवाचे नेते आहेत. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अजित पवारांसह सगळे परत आले हाेते. स्टेपनीशिवाय सरकार चालू शकत नाही. अजित पवार आता महत्तवाचे चाक झाले आहेत, ते चाक आता गाडीला लागले आहे. ''

...आणि धनंजय मुंडे आमच्या साेबत असल्याचे बेधडक सांगितले. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यानंतर वायसीएम सेंटर येथे सर्व आमदार येत हाेते. परंतु धनंजय मुंडे कुठे आहेत हे काेणाला माहित नव्हते. तेव्हा धनंजय मुंडे यांच्याविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता धनंजय मुंडे आमच्यासाेबत असून ते 10 मिनिटात इथे येतील असे बेधडक सांगितल्याची कबुली राऊत यांनी दिली. ताेपर्यंत मुंडे यांच्याशी राऊत यांचे कुठलेही बाेलणे झाले नव्हते. मी असे बाेलल्याचे पाहून मुंडे परत आले असतील अशी टिप्पणीही राऊत यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारLokmatलोकमत