शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांनी श्रीसदस्यांचा अंत पाहिला...; संजय राऊतांचे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 10:52 IST

"सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी योग्यच"

Sanjay Raut vs Eknath Shinde Devendra Fadnavis: ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी खारघर येथे झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात भल्या मोठ्या संख्येने श्रीसदस्य उपस्थित होते. त्यापैकी काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील ११ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात जाहीर केली असून उपचार सुरू असलेल्यांचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण या घटनेमुळे विरोधी पक्ष सरकारवर चांगलाच संंतापला आहे. सरकारने श्रीसदस्यांचा अंत पाहिला, असा अतिशय गंभीर आरोप शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

" महाराष्ट्राच्या मनाला चटका लावून जाणारी ही दुर्दैवी घटना आहे. आप्पासाहेबांचे लाखो अनुयायी या सोहळ्याला जमतील हे साऱ्यांनाच माहिती होते. त्यामुळे सरकारने जी तयारी करायला हवी होती, ती फक्त VIP लोकांसाठीच केली असं माझं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे लाखो सदस्य आले होते. त्या लाखोंची सोय न पाहता, केवळ गृहमंत्री अमित शाह यांची सोय पाहता भर दुपारच्या वेळेत ही सभा आणि सोहळा ठेवला गेला. हा कार्यक्रम संध्याकाळी झाला असता तर ही दुर्घटना टळली असती. गृहमंत्री आणि VIP छपराखाली होते, पण श्रीसदस्य उन्हात होते. आम्हाला सोहळ्यावर टीका करायची नाही. राजकारण्यांनी श्रीसदस्यांचा अंत पाहिला", असे अतिशय रोखठोक मत संजय राऊतांनी व्यक्त केले.

"या कार्यक्रमात समोर ऊन्हात बसलेल्या लोकांचा विचार न करता व्यासपीठावर जो राजकीय मंच सजला होता त्यांचाच जास्त विचार करण्यात आला होता. आप्पासाहेब वगळता इतर सर्व राजकीय लोकांच्या कुरघोड्या सुरू होत्या. आप्पासाहेब यांना मानणारा समुदाय समोर बसला होता. त्यांना राजकारणाशी घेणंदेणं नव्हतं. पण राजकारण्यांनी त्या लोकांचा अंत पाहिला आणि त्यामुळे त्यांचा बळी गेला ही बाब दुर्दैवी आहे," असा आरोप राऊतांनी केला. 

दरम्यान, उपचार घेत असलेल्या श्री सदस्यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विरोधी पक्षातील काही नेत्यांनी भेट घेतली. नागपूरमधील महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा संपवून रात्री १.३० वाजताच्या सुमारास एमजीएम रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी रुग्णालयातील श्रीसेवकांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर देखील टीका केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMaharashtraमहाराष्ट्रNavi Mumbaiनवी मुंबई