शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांना PM पदाची संधी मिळाली तर शरद पवार...; पटोलेंनी केला पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 16:52 IST

राउतांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राउतांवर थेट निशाणा साधला आहे. 

उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत? याचा निर्णय इंडिया आघाडीत बसून घेतला जाईल. पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर, शरद पवार पाठिंबा देतील, असे वक्तव्य संजय राऊत यांनी सांगलीमध्ये पत्रकारासोबत बोलताना केले. राउतांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राउतांवर थेट निशाणा साधला आहे. 

काय म्हणाले पटोले? -"संजय राऊत रोज आपलं वक्तव्य बदलतात. त्यामुळे संजय राउतांच्या वक्तव्याला फार काही महत्व देऊ नका. कालपर्यंत राहुल गांधींना पंतप्रधान बनवायला निघाले होते. आज आता त्यांन उद्धव ठाकरे दिसत आहेत. यामुळे त्यांच्या या पद्धतीच्या वक्तव्याकडे फार काही लक्ष देऊ नका आणि संजय राउतांनीही अशा पद्धतीचे वक्तव्य करू नेये."

नेमकं काय म्हणाले होते राऊत? -"उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत, याचा निर्णय इंडिया आघाडीत बसून घेतला जाईल. शरद पवार यांचे कर्तृत्व असताना त्यांना हे पद मिळले नाही. उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केले आहे. आमच्याकडे जास्त चेहरे आहेत. मोदी एके मोदी नाही. पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, महाराष्ट्राला पंतप्रधान पदाचा मान का मिळू नये, असा सवालही संजय राऊत यांनी केला.

"राज्यात 35 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या खात्यात" -देशात इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीत 300 पेक्षा जास्त जागा मिळतील, तर राज्यात 35 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जमा होतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच, दूरदर्शन हे भाजपा प्रणित झाले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. लोगो भगवा झाला म्हणून हिंदुत्वव उजळून निघाला असे नाही, असा चिमटा त्यांनी काढला. अजित पवार यांचा एकही खासदार निवडून येणार नाही, भविष्यात ते भाजपात विलीन होईल, असा टोला संजय राऊत यांनी हाणला. तर बारामतीमधून सुप्रिया सुळे या बहुमताने निवडून येतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNana Patoleनाना पटोले