शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:46 IST

Sanjay Raut News: चंद्रहार पाटील यांच्यासाठी काय कमी केले. आर्थिक लाभापोटी त्यांनी हा निर्णय घेतल्याचा दावा संजय राऊतांनी केला.

Sanjay Raut News: सांगली जिल्ह्यातील उद्धवसेनेचे पदाधिकारी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यासह उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केला. चंद्रहार पाटील यांच्यासोबत सातारा जिल्ह्यातील पहिला हिंद केसरी संतोष आबा वेताळ, पैलवान विकास पाटील यांनीही पक्षात प्रवेश केला. चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाला केलेला जय महाराष्ट्र जिव्हारी लागल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खंत बोलून दाखवली.

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, चंद्रहार पाटील यांनी निवडणूक लढावी अशी इच्छा होती. त्या इच्छेसाठी आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली. अशा माणसाने स्वार्थासाठी, लाभासाठी बेईमान व्हावे, हीच तर बेईमानी आहे. चंद्रहार पाटील यांच्यासाठी काय कमी केले. ठीक आहे सत्ता आली नाही. तुमच्या गावात तुम्हाला मते पडली नाहीत, अशी टीकाही संजय राऊतांनी केली. 

आर्थिक लाभापोटीच चंद्रहार पाटील शिंदे गटात

तो कुणाच्या गळ्यातील चंद्रहार आहे, हा मुद्दा जाऊ द्या. अशी उपमा देऊ नका. त्याला विटासारख्या गावात १० हजार मते घेता आली नाहीत. अपक्ष लढणार होता. उमदा तरूण होता. त्याच्या क्षेत्रात त्याला काही तरी करायचे होते, म्हणून आम्ही उमेदवारी दिली. तो जर अपक्ष लढला असता तर ५ हजार मतेही मिळाली नसती. ६० हजार मते शिवसेनेची होती, म्हणून ती त्याला मिळाली. आर्थिक लाभापोटीच चंद्रहार पाटील शिंदे गटात गेल्याचा दावा संजय राऊतांनी केला. 

दरम्यान, चंद्रहार पाटील यांचे पक्षात स्वागत करताना एकनाथ शिंदे म्हणाले होते की, नकली आखाड्यातून खऱ्या आखाड्यात आलात. पैलवान पाटील हे कुटील माणसाकडून स्वच्छ मनाच्या माणसाकडे आले आहेत. पाटील यांनी मराठी मातीचा खेळ असलेल्या कुस्तीला लौकिक मिळवून दिला. पैलवान हे महाराष्ट्राचे वैभव आहे. मी जरी पैलवान नसलो तरी २०२२ मध्ये समोरच्या लोकांना चारीमुंड्या चीत केले. तेव्हा असे डावपेच टाकले की ते अद्याप उठले नाहीत. पैलवानांना डावपेच माहीत असतात. कुस्तीला बळ देण्यासाठी त्याला राजकीय पाठिंबा आवश्यक आहे. चंद्रहार पाटील यांचा आखाडा मंत्री सामंत यांनी बघितला आहे. पाटील यांचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी शिंदेसेनेची आहे, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाchandrahar patilचंद्रहार पाटील