शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

“अजित पवार सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 13:15 IST

Sanjay Raut News: अजित पवार यांना शुभेच्छा. पण, अनेकजण जुगाड करून लायकी नसताना मुख्यमंत्री होतात, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

Sanjay Raut News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असून, पक्ष सोडण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. मात्र, खुद्द अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण देत खुलासा केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र, यातच आता अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावरून प्रतिक्रिया येत असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे, असे म्हटले आहे. 

आगामी २०२४ च्या निवडणुकीनंतर काय, आता म्हटले तरी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे. मला १०० टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. या दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता. ठाकरे यांच्यासोबत आनंदाने, समाधानाने काम केले. पण, चव्हाण यांच्यासोबत नाईलाजाने आणि वरिष्ठांनी सांगितल्यामुळे काम केले, असा खुलासा अजित पवार यांनी केला. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अजित पवारांना शुभेच्छा आहेत

अजित पवारांनी प्रथमच मुख्यमंत्रीपदाबाबत इच्छा व्यक्त केली नाही. त्यामुळे अजित पवारांना माझ्या शुभेच्छा आहेत. मुख्यमंत्री होण्यास कोणाला आवडणार नाही. अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. ते अनेक वर्षापासून राजकारणात असून, मंत्रीही होते. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटते आपण मुख्यमंत्री व्हावे. अनेकजण जुगाड करून लायकी नसताना मुख्यमंत्री होतात, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.

दरम्यान, सन २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७१ तर काँग्रेसचे ६९ आमदार निवडून आले होते. त्यावेळी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी मिळेल अशी शक्यता होती. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनाही तसेच वाटत होते. पण, दिल्लीत काय घडले माहिती नाही. काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद दिले गेले. पण, त्यावेळी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आले असते तर कदाचित दिवंगत आर. आर.पाटील मुख्यमंत्री झाले असते, असे अजित पवार यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवार