शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 13:30 IST

Sanjay Raut News: सुप्रिया सुळे यांना मी ओळखतो. धर्मांध, महाराष्ट्रद्रोही पक्षासोबत सुप्रिया सुळे जातील, असे मला वाटत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut News: अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात. आताच्या घडीला ईडी, सीबीआय, पोलीस यंत्रणेच्या हातात गोष्टी आहेत. राहुल गांधी यांच्या लेखामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अनेकांना मिरच्या झोंबलेल्या आहेत. यंत्रणांचा वापर करून तुम्ही निवडणुका जिंकल्या आणि आमचे पक्ष फोडले. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष बुडबुडे आहेत. हे बुडबुडे लवकरच फुटतील. मुख्य म्हणजे मोदी आणि शाह यांच्या भ्रमाचा भोपळा दररोज फुटत आहे. तुम्ही कितीही खोटे बोला, रेटून बोला. प्रेसिडेंट ट्रम्प यांना तुम्ही अद्यापही उत्तर देऊ शकत नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली. 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रि‍करणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, धर्मांध, जातीय आणि महाराष्ट्रद्रोही पक्षासोबत अजित पवार गेले आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार कोणत्या मोठ्या क्रांतिकारी विचारांनी गेलेले नाहीत. भाजपाचा विचार हा शहीद भगत सिंग, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार नाही. लुटा, खा आणि वाटा, हाच त्यांचा विचार आहे. सुप्रिया सुळे यांना मी ओळखतो. अशा पक्षाबरोबर सुप्रिया सुळे जातील, असे मला वाटत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांची ६० वर्षांहून अधिक काळ राजकारणात काम केले

शरद पवार यांची विचारधारा ही फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जाणारी आहे. यशवंतराव चव्हाण यांचा विचार पुढे घेऊन जाणारी आहे. हाच विचार घेऊन शरद पवार यांची ६० वर्षांहून अधिक काळ राजकारणात काम केले. सुप्रिया सुळे त्यांच्या कन्या आहेत. त्यामुळे चुकीच्या मार्गाने त्या जाऊ शकतील, याविषयी माझ्या मनात शंका आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ज्यांना तुम्ही तुरुंगात टाकायला निघाला होता, देशद्रोहाचे आरोप लावले, भ्रष्टाचाराचे आरोप लावले, चुकीचे आरोप लावले, यावरूनच सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी तुमचे राजकारण किती खालच्या पातळीवर आले, हे दिसत आहे, अशी टीका संजय राऊतांनी भाजपावर केली. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट तयार झाले आहेत. हे दोन्ही गट आज त्यांचा २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा नाही. त्याची काही निश्चित वेळ ठरलेली नाही. माझ्यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना सर्वात महत्त्वाच्या आहेत. मी आत्ताच भारतात आले आहे. १४ दिवस परदेशात होते. त्यानंतर दोन दिवस दिल्लीत होते. त्यामुळे माझ्यापर्यंत अशी कुठलीही चर्चा आलेली नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSupriya Suleसुप्रिया सुळेSupriya Suleसुप्रिया सुळेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस