शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: ...यात राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडतेय; संजय राऊतांनी केले भाजपच्या टाळीवरही भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 11:25 IST

फडणवीसांना माफ करा अशा मागण्या कोणी केलेल्या नाहीत. त्यांना माफ करायचं की नाही ते आम्ही ठरवू. - संजय राऊत

भाजपाला समेटाचा प्रस्ताव दिलेला नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले असताना संजय राऊतांनी देखील यावर भाष्य केले आहे. भाजपकडून हात जरी आला तरी अजिबात स्वीकारला जाणार नाही, असे राऊतांनी म्हटले आहे. 

 भाजपने नागालँडमध्ये सत्ता स्थापन केलेली नाही. नागालँड हे सीमावर्ती राज्य आहे, संवेदनशील राज्य आहे. रिओ पार्टीबरोबर भाजपची युती होती, त्यात भाजपला १०-१२ जागा मिळाल्या आहेत. सर्वांनी एकत्रित येत सरकार बनवलेय हे खरे आहे. असा प्रयोग तिथे आधी देखील झाला आहे कारण राज्याची ती गरज आहे, असे राऊत म्हणाले. 

विकासाच्या दृष्टीनं पाऊल टाकता यावी त्यामुळे अशाप्रकारे निर्णय घेतले जातात, हे लोकांपर्यंत पोहोचविण्यात राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडत आहे. काश्मीरपेक्षाही तिथली सुरक्षाविषयक परिस्थिती गंभीर आह. भाजप तिथल्या सरकारमध्ये सहभागी झालेय. महाविकास आघाडीची आज बैठक आहे, त्यावर चर्चेत नक्की हा विषय देखील येईल, असेही राऊत म्हणाले. 

फडणवीसांना माफ करा अशा मागण्या कोणी केलेल्या नाहीत. त्यांना माफ करायचं की नाही ते आम्ही ठरवू. ज्यापद्धतीनं महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष, जो राज्याच्या हितासाठी, हिंदुत्ववादी पक्ष, केंद्रीय यंत्रणा आणि पैशाचा वापर करत तोडला हा महाराष्ट्रावर केलेला आघात आहे. राज्याची जनताच आता ठरवेल त्यांना माफ करायचं की नाही. मात्र महाराष्ट्रातील जनता ही वेदना विसरणार नाही. तुम्ही माफीचं वाटप करायला बसला आहात का? महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला हा घाव आहे. हा घाव शिवसेना कधीही विसरणार नाही. भाजपकडून हात जरी आला तरी अजिबात स्वीकारला जाणार नाही, अशा शब्दांत राऊतांनी भाजपा आणि फडणवीस यांना फटकारले आहे. राजकारणात मतभेद होत असतात पण तुम्ही बाळासाहेबांनी निर्माण केलेला पक्ष फोडला, तोडला आणि चोर लफंग्यांच्या हातात ठेवला, कोण तुम्हाला माफ करेल? असा सवालही त्यांनी केला आहे.

मनसेचे सर्व शिवसेनेतच होते. शिवसेना आणि बाळासाहेब नसते तर आपण कुठे असतो याचं आत्मचिंतन या लोकांनी केलं पाहिजे. मुळ शिवसेना आपल्या जागेवरच आहे, भाजपनं ती विकली असली, नावाने केली असली तरी मूळ शिवसेना ती मूळ शिवसेना आहे, असे मनसेच्या वर्धापन दिनावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस