शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
2
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
3
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
4
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
5
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
7
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
8
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
12
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
13
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
14
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
15
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
16
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
17
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
18
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
19
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
20
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे

तुमचा ना छत्रपतींशी संबंध ना इतिहासाशी, केवळ...: संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 13:54 IST

राज्यातले उद्योग कुठे जातायेत हे महाराष्ट्रातील उद्योगमंत्र्यांना माहिती नसेल तर ते दुर्दैव आहे असंही राऊत म्हणाले.

मुंबई - आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडतो, महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे त्यावर आवाज उठवतोय. राज्याची बेकायदेशीरपणे लूट चालू आहे त्यावर बोलतोय. त्याला तुम्ही वेडेपणा म्हणत असाल तर हो आम्ही वेडे आहोत. वेडात मराठे वीर दौडले साथ ही आमची परंपरा आहे. त्या परंपरेला धरून आणि स्मरून आम्ही हल्ले करतोय. तुमचा ना छत्रपतींशी संबंध, ना इतिहासाची, तुमचा केवळ खोक्यांशी संबंध अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, मी अधिक बोलत नाही. तुमचे प्रदेशाध्यक्ष यांच्या कर्तबगारी यावर बोला. आमच्यावर का बोलताय?. अजित पवार, शिंदे गटाचे बहुतेक आमदार, खासदार भाजपात प्रवेश करतील आणि भाजपाने त्यांना उमेदवारी दिली तर ते कमळ चिन्हावर निवडणूक लढतील. अजित पवार, शिंदे गटाला कमळाबाईच्या पदराखाली लपून निवडणूक लढवावी लागेल. ज्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरेंना सोडले ते बहुतेक सगळेच लोक पराभूत होतील. गद्दारांना स्वीकारण्याची मानसिकता लोकांची नाही. तुम्ही महापालिका निवडणूक घेत नाही. उद्या लोकसभा, विधानसभाही घेणार नाहीत अशी हुकुमशाही सुरू आहे असा आरोप त्यांनी केला. 

तसेच राज्यातले उद्योग कुठे जातायेत हे महाराष्ट्रातील उद्योगमंत्र्यांना माहिती नसेल तर ते दुर्दैव आहे. मकाऊला जाणे गुन्हा आहे असं मी म्हटलो नाही. वाळवंटात आणि चिखलात असं जग चीनने उभे केलेय त्यातून त्यांची आर्थिक उभारी मिळाली आहे. बावनकुळे यांनी साडे तीन कोटी उधळले असतील तर बोला आणि शांत बसा. तुम्ही मकाऊला जाऊन काय केले यावर आम्ही प्रश्न न विचारता तुम्हीच सांगत बसलाय असा टोला भाजपा नेत्यांना राऊतांनी लगावला. 

किरीट सोमय्यांना प्रत्युत्तरऑक्सिजन पुरवठा झाला नाही, कोरोना काळात प्रेतांचा खच पडला, गंगेत प्रेत वाहून गेली. मध्य प्रदेशात कोरोना काळात जे मृत झाले त्यांच्यावर उपचार केलेले दाखवून कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला. सोमय्यांनी चुकून मुंबईचा उल्लेख केला. हे भंपक लोक आहेत. मुंबईसह महाराष्ट्र कोरोना काळात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात वाचवण्यात आला. तुम्ही जनमत घ्या. उद्धव ठाकरेंच्या कार्याची दखल देशातच नव्हे तर जगानेही घेतली. हे सगळे रावण आहेत अशा शब्दात संजय राऊतांनी सोमय्यांवर पलटवार केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा