शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"संजय राऊत महागद्दार, तो राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेला....”; आमदार बांगर यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 16:53 IST

Sanjay Raut vs Santosh Bangar: राऊत आणि शिंदे गट यांच्यात कायमच शाब्दिक चकमक पाहायला मिळते

Sanjay Raut vs Santosh Bangar: गेल्या वर्षी महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेत उभी फूट पडून एकनाथ शिंदे काही आमदारांसह सूरत आणि गुवाहाटीला निघून गेले. त्यानंतर ३९ आमदारांच्या पाठिंब्याने त्यांनी भाजपासोबत सत्तास्थापना केली. काही दिवसांपूर्वी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. त्यानंतर संजय राऊत सातत्याने शिंदे गटावर टीका करताना दिसत आहेत. पण आता शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच, त्यांची थेट कुत्र्याशी तुलना केली.

संजय राऊतांची थेट कुत्र्याशी तुलना

"संजय राऊत हे खोक्यांवरून जी टीका करतात, त्याचा आता कंटाळा आला आहे. संजय राऊत ज्या आमदारांना खोके-खोके म्हणत आहेत, त्याच आमदारांच्या जीवावर हा खासदार झालाय. म्हणून मला वाटतं की, संजय राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं. संजय राऊत हा महागद्दार आहे. त्याने शिवसेना संपवून टाकली. संजय राऊत हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधलेला कुत्रा आहे. आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करू नका. संजय राऊतांना पुन्हा सांगायचं आहे की, तुम्ही शिवसेना संपवली आहे. शिवसेनेला तुम्ही कुठे नेऊन ठेवलं आहे, हे महाराष्ट्राची जनता बघत आहे," असा सणसणीत हल्लाबोल बांगर यांनी केला.

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारच्या 'आनंदाचा शिधा’ योजनेवरून शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली होती. "आनंदाचा शिधा अद्याप लोकांपर्यंत पोहोचला नाही. पण तो शिधा खोक्याच्या मार्फत सर्व ४० आमदारांना मिळाला आहे," अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे गटाला डिवचलं होतं. राऊतांच्या या टीकेबद्दल विचारलं असता संतोष बांगर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी संजय राऊतांशी तुलना थेट कुत्र्याशी केली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेdogकुत्राNCPराष्ट्रवादी काँग्रेस