शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

"बाळासाहेबांच्या शिवसेनेला बदनाम करण्याचा विडा संजय राऊतांनी उचललाय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 13:30 IST

खोके आणि गद्दार एवढाच मुद्दा राऊतांकडे शिल्लक आहेत. भूखंड वाटपात कुठलाही घोटाळा झाला नाही असा दावा मंत्री संदीपान भुमरेंनी केला.

औरंगाबाद - संजय राऊत केवळ आरोप करतात. ५० खोके आरोप करून चालत नाही तर ते सिद्ध करावं लागते. काही चौकशी करायची ती करा. फक्त बदनाम करण्याचं काम राऊत करतात. राऊतांना काय आरोप करायचे ते करू द्या. जनता आमच्यासोबत आहे. संजय राऊतांच्या पायाखालची जमीन सरकलीय. बाळासाहेबांच्या शिवसेनेला बदनाम करण्याचा विडा संजय राऊतांनी उचललाय असा टोला मंत्री संदीपान भुमरे यांनी राऊतांना लगावला. 

संदीपान भुमरे म्हणाले की, खोके आणि गद्दार एवढाच मुद्दा राऊतांकडे शिल्लक आहेत. भूखंड वाटपात कुठलाही घोटाळा झाला नाही. सभागृहात यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जनतेसमोर एकनाथ शिंदेंना बदनाम करायचं. कुठेतरी चर्चा वेगळ्या दिशेला न्यायची म्हणून हा विषय विरोधकांनी हाती घेतलाय. युती शासनाला बदनाम करण्याचं काम विरोधकांकडे आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच ग्रामपंचायत निकालात सगळ्या युतीच्या ग्रामपंचायती आल्यात. ठाकरे गट चौथ्या क्रमांकावर आहे. जनतेचा त्यांच्यावर किती विश्वास आहे हे लक्षात आलं असेल. नुसतं आरोप करून चालत नाही तर काम करून दाखवायचं असतं. एखादा खोका घेतलाय ते सिद्ध करा. विमानातून खोके आणता येतात का? हा उठाव वेगळ्या कारणाने झालाय. २०२४ मध्ये जनता कुणासोबत हे ठाकरेंना कळेल. पैठण विधानसभा क्षेत्रात १-२ ग्रामपंचायती वगळता सगळीकडे आमची सत्ता आली असंही संदीपान भुमरे म्हणाले. 

काय म्हणाले होते संजय राऊत?मुख्यमंत्र्यावरील आरोप गंभीर आहेत. भूखंड वाटप घोटाळ्याचे कागदपत्रे केंद्रातील अनेक प्रमुखांना पाठवली आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांना पुरावे दिलेत. बहुतेक देवेंद्र फडणवीस दिल्लीत घाईने आले असतील तर नक्कीच त्यावर चर्चा झाली असेल. ११० कोटींचे भूखंड २ कोटींना आपल्या मर्जीतील बिल्डरांना दिलेत. जे १६ भूखंड गरिबांच्या घरांसाठी राखीव होते. तरीही तेव्हाच्या नगरविकास मंत्र्यांनी जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी हे भूखंड वाटप घाईघाईने केले. हायकोर्टाने त्यावर ताशेरे मारलेत असं सांगत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप केला. 

त्याचसोबत जे ४० आमदार ज्याप्रकारे ५०-५० खोके देऊन फोडण्यात आले तो काय व्यवहार होता त्यावर SIT स्थापन करणं गरजेचे आहे. पण जे विषय संपलेले आहे त्यावर SIT स्थापन करून सत्तेचा, पोलिसांचा गैरवापर सुरू आहे असा आरोपही राऊतांनी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSandipan Bhumreसंदीपान भुमरेShiv Senaशिवसेना