शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पवारांच्या घरावरील हल्ल्यात संजय राऊतांचाच हात तर नाही ना?, प्रवीण दरेकरांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 11:36 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला करणारे एसटी कर्मचारी नव्हते. यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे याची कल्पना सर्वांनाच आहे. गृहमंत्र्यांची याची पाळंमुळं शोधून काढावीत अशी मागणी करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भाजपावर हल्लाबोल केला.

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला करणारे एसटी कर्मचारी नव्हते. यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे याची कल्पना सर्वांनाच आहे. गृहमंत्र्यांची याची पाळंमुळं शोधून काढावीत अशी मागणी करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भाजपावर हल्लाबोल केला. राऊत यांनी शरद पवारांची सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली. "पवारांच्या घरावर हल्ला करायला लावता हे पाप तुम्ही कुठे फेडाल? विरोधी पक्षाचा हा दळभद्रीपणाचा कळस आहे. सदावर्तेंना भाजपाचा पाठिंबा असून त्यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात गरळ ओकण्यासाठीच ठेवलेलं आहे", असा आरोप संजय राऊत यांनी केला. 

संजय राऊतांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पवारांच्या घरावरील हल्ल्यात संजय राऊतांचाच हात तर नाही ना? याचा तपास करण्याची गरज आहे, असं विधान करत खळबळ उडवून दिली आहे. "संजय राऊत यांना प्रसिद्धीची सवय आहे. त्यांची प्रॉपर्टी जप्त झाली त्यामुळे ते नैराश्यात आहेत. पोलिसांनी त्यांच्यावरच लक्ष ठेवावं. पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे राऊतांचाच हात तर नाही ना? याची चौकशी करण्याची गरज आता निर्माण झाली आहे", असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. 

"संजय राऊत राज्याच्या पोलिसांनाच बुळचट म्हणतात मग तुमचंच सरकार आहे. तर पोलीस आयुक्त संजय पांडे यांना निलंबित करण्याची धमक तुम्ही दाखवणार का?", असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला आहे. 

संजय राऊत काय म्हणाले?"राज्यातील विरोधी पक्षाचा दळभद्रीपणाचा कळस केला आहे. पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या घरावर हल्ला करायला लावता हे पाप तुम्ही कुठे फेडाल? भाजपाचा नवनिर्माण केलेला नेता सदावर्ते याला भाजपाचा पाठिंबा आहे. तो कुठे राहतो. कुणाच्या घरात राहतो. त्याला आर्थिक पाठबळ कुणाचं आहे. त्याला फक्त पवार, ठाकरेंविरोधात गरळ ओकण्यासाठीच ठेवलेलं आहे", असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

"आता जे आंदोलक रेल्वे स्टेशनला बसलेत त्यांच्याकडे सगळ्यांकडे एकाच वेळेला प्लॅटफॉर्म तिकीट कसे आले. कोणती यंत्रणा काम करतेय? महाराष्ट्रात तुम्हाला काय घडवायचं आहे? एसटी कर्मचाऱ्यांप्रती आम्हालाही सहानुभूती आहे. शिवसेना नेहमीच कष्टकऱ्यांच्या बाजूनं उभा राहत आली आहे. पण त्यामागून महाराष्ट्राला बदनाम करण्याची कट-करस्थानं रचली जात आहेत. याचं पाप तुम्ही कुठं फेडणार आहात?", अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरSanjay Rautसंजय राऊतST Strikeएसटी संप