शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut ED Action: संजय राऊतांना कोणत्याही क्षणी ईडी ताब्यात घेणार; पोलिसांचा मोठा फौजफाटा, शिवसैनिक जमण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 10:19 IST

पत्रा चाळ प्रकरणी राऊत यांना गेल्या काही काळापासून ईडी समन्स बजावत होती. यावर राऊत वेगवेगळी कारणे देत चौकशी टाळत होते.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी सकाळी सकाळीच ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. संजय राऊत आणि त्यांची पत्नी यांची चौकशी सुरु आहे. राऊत यांच्या घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा वाढू लागला असून शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील जमू लागले आहेत. 

पत्रा चाळ प्रकरणी राऊत यांना गेल्या काही काळापासून ईडी समन्स बजावत होती. यावर राऊत वेगवेगळी कारणे देत चौकशी टाळत होते. यापूर्वी २० जुलैला नंतर २७ जुलैला ईडीने समन्य बजावले होते. परंतू राऊत यांनी लोकसभा अधिवेशन सुरु असल्याने उपस्थित राहू शकत नाही, असे ईडीला कळविले होते. शनिवारी राऊत मुंबईत आले आणि ईडीने रविवारी सकाळीच राऊतांच्या घरी हजेरी लावली. 

राऊत यांच्यावर कारवाई करण्यासाठी ईडीचे १० अधिकारी आणि दोन कर्मचारी आहेत. या अधिकाऱ्यांच्या तीन टीम बनविण्यात आल्या आहेत. पश्चिम उपनगरात, दुसरी मध्य मुंबईतील कार्यालयात पोहोचली आहे. ईडीने आपल्यासोबत मोठा पोलीस फौजफाटा बोलविला आहे. ईडीच्या एका अधिकाऱ्यांने मराठी वृत्तवाहिनीला राऊतांना ईडी कार्यालयात घेऊन जाणार असल्याचे सांगितले. 

साक्षीदार महिलेला बलात्काराच्या धमक्या...महाराष्ट्रातील आधीच्या नेत्यांवरील ईडीची कारवाई पाहता, ईडी आधी ताब्यात घेते नंतर अटक करते. ईडीकडून तपास सुरू असलेल्या पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणातील साक्षीदाराने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात दिलेला जबाब मागे घेण्याच्या धमक्या मिळाल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र नोंद करत तपास सुरू केला आहे.

साक्षीदार महिलेने वाकोला पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. बलात्कार तसेच जीवे मारण्याची धमकी त्यांना दिल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. ईडीने गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, मुंबईचे माजी संचालक प्रवीण एम राऊत यांच्याकडे पालघर, सफाळे, पडघा येथील जमीन, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि किहीम येथील भूखंड या मालमत्ता जप्त केल्या.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय