शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गॅस टंचाईवरून संजय राऊतांची सरकारवर टीका; PM मोदींचे नाव घेत म्हणाले, “ते मोठे वैज्ञानिक...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:27 IST

Sanjay Raut News: देशात गॅसची मोठी टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे.

Sanjay Raut News: पंतप्रधान मोदी हे फार मोठे वैज्ञानिक आहेत, संशोधक आहेत. त्यांनी फार वर्षांपूर्वी एक शोध लावला होता, नाल्यातून गॅस निर्मिती करता येईल. मुंबईतील मिठी नदीच्या किनाऱ्यावर अशा प्रकारचा प्रकल्प मोदींच्या संकल्पनेतून निर्माण करता येईल का? त्याचे उद्घाटन करायला देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौरांनी नरेंद्र मोदी यांनाच बोलवावे. त्यामधून प्रेरणा घेऊन देशभरात असे अनेक उद्योग निर्माण होतील, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. 

आखातातील इराण-अमेरिका, इस्रायल युद्धाचे परिणाम देशासह महाराष्ट्रातही दिसू लागले आहेत. मध्यपूर्वेतून होणारा ऊर्जा पुरवठा थांबल्यामुळे एलपीजी गॅसच्या पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले असून राज्यातील अनेक भागात गॅसचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारनेही ५ मार्चला अधिसूचना काढून व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅसवर निर्बंध आणले आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या महानगरांसह राज्यातील अनेक शहरांमध्ये हॉटेल व्यावसायिकांना फटका बसला. सिलिंडर मिळण्यास विलंब होत असल्याने आणि भीतीमुळे नागिकांनी गॅस पुरवठा केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. यावरून विरोधक राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करत आहेत. 

अनुदान लागले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर करावे

आखाती देशांमधील युद्धामुळे गॅसची जी टंचाई निर्माण झाली आहे, ती आम्हाला पंतप्रधान मोदी यांच्या कृपेने दूर करता येईल. परंतु, पहिले उद्घाटन त्यांनी मुंबईतील मिठी नदीवर करावे. त्यासाठी लागणाऱ्या पाईपची व्यवस्था आम्ही करायला तयार आहोत. तसेच या प्रकल्पासाठी कोणतेही अनुदान लागले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर करावे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, देशात गॅसची मोठी टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. सरकारकडून सांगण्यात आले होते की, या युद्धाचा कोणताही परिणाम होणार नाही. पण सरकारने जनतेला दिलेले हे आश्वासन फोल ठरले. मुंबईसारख्या शहरात गॅस टंचाईमुळे रेस्टॉरंट आणि हॉटेल्स बंद आहेत. व्यावसायिक गॅसपुरवठा ठप्प झाल्याने वाहन उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. सातारा आणि सांगली येथील इंजिनिअरिंग उद्योग पूर्णपणे बंद आहेत. चाकण वाहन उद्योग अडचणीत आला आहे, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतCylinderगॅस सिलेंडरState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार