शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

“आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८५ जागा मिळतील”; संजय राऊतांचे भाकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 12:44 IST

Sanjay Raut News: केंद्रात एनडीएचे सरकार आले तर ते टिकणार नाही. अनैतिक सरकार स्थापन झाल्यानंतर ते पाडून इंडिया आघाडीचे सरकार येण्यात मजा आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

Sanjay Raut News: लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आले नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपाला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला. ४०० पारचा नारा दिला असला तरी प्रत्यक्षात भाजपाचे २४० खासदार निवडून आले. राज्यात दोन आकडी संख्याही भाजपाला गाठता आली नाही. यातच पराभवाची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी इच्छा व्यक्त केली. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका करताना, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८५ जागा मिळतील, असे भाकित केले आहे. 

राज्यात महाविकास आघाडीने महायुतीला तगडे आव्हान देत जास्त जागा मिळवल्या. यानंतर आता संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेऊन महाराष्ट्र संपवण्याचा प्रयत्न केला. राजकीय विरोधकांवर सूडाच्या कारवाया करण्यात ते आघाडीवर होते. अशा प्रकारची व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणात असावी असे आम्हाला वाटत नाही. लोकांचा जेवढा राग मोदी-शाहांवर नाही, तेवढा राग महाराष्ट्रात फडणवीसांवर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली. देवेंद्र फडणवीस हे पेशवाईतल्या आनंदीबाईंप्रमाणे वागत आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. 

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८५ जागा मिळतील

काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत त्यात शिवसेनेचेही योगदान आहे. आम्ही त्याबाबत वेळ आली चर्चा करु. महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. विधानसभेला याहून मोठे यश मिळेल. आमच्या जागा चोरण्याचा, विजय चोरण्याचा प्रयत्न झाला. अमोल कीर्तिकरांच्या जागेसाठी जो प्रयत्न झाला, ते अनेक ठिकाणी झाले. विधानसभा निवडणुकीत ते होणार नाही. आम्ही १८० ते १८५ जागा सहज निवडून येऊ, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे. 

दरम्यान, एनडीएची दारे चंद्राबाबू नायडूंसाठी बंद आहेत हे अमित शाह यांनी जाहीर केले होते. २०१९ मध्ये चंद्राबाबू म्हणाले होते की, नरेंद्र मोदी लोकशाहीचा गळा घोटत आहेत. आता त्याच चंद्राबाबूंना यांनी बरोबर घेतले आहे. त्यामुळे हे सरकार आले तर ते टिकणार नाही. अनैतिक सरकार स्थापन झाल्यानंतर ते पाडून येण्यात मजा आहे ते आत्ता बनवण्यात नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी