शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"संजय राऊत यांना पिसाळलेला कुत्रा चावलाय"; सीमाप्रश्नावरून शिंदे गटाच्या आमदाराची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 18:12 IST

"संजय राऊत यांनी आज कर्नाटक प्रश्नावर जे मत मांडले आहे, मला वाटते, की त्यांना पुन्हा पिसाळलेला कुत्रा चावला आहे."

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारने जतमध्ये सोडलेल्या पाण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सरकारने, कर्नाटकनं सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्यायला पाहिजे. या महाराष्ट्रावर असे आक्रमण आणि अतिक्रमण गेल्या 50-55 वर्षांत झाले नव्हते. बाजूच्या राज्याचा मुख्यमंत्री तुम्हाला सरळ डिवचतोय, आव्हान देतोय या महाराष्ट्राला. ते जे पाणी सोडले आहे ना, चुल्लू भर पाणी में डूब जाओ म्हणतोना आपण, जा त्या पाण्यात जलसमाधी घ्या," असे राऊतांनी म्हटले आहे. त्यांच्या याच वक्तव्यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जहरी शब्दांत टीका केली आहे.शिरसाट म्हणाले, "संजय राऊत यांनी आज कर्नाटक प्रश्नावर जे मत मांडले आहे, मला वाटते, की त्यांना पुन्हा पिसाळलेला कुत्रा चावला आहे. दर वेळेला नवीन वाद करायचे, जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा यांनी तोंड का उघडले नाही? अडीच वर्ष झोपा काढत होते का हे लोक? त्यावेळी त्यांना हे सुचले नाही. ज्या गोष्टी आपल्या करायच्या नसताता, करता येत नाहीत, त्या दुसऱ्यावर कशा थोपवायच्या हा प्रयत्न त्यांनी केला आहे. संजय राऊत कडून अपेक्षा काय करता?," असा सवालही त्यांनी केला.

शिरसाट म्हणाले, ते आम्हाला म्हणतात, आमच्या कपाळावर गद्दार कोरल्या जाणार आहे? अरे तुमच्या पेक्षा जास्त शिवसेने आम्ही पाहिली आहे. तुम्ही आम्हाला काय शिवसेना शिकवता? शिवसेनेत काय चालतं आणि काय केलंय आम्ही, हे आमच्या जीवाला विचारा. आम्ही तेथे ३८ वर्ष काढली आहेत आणि यांच्यासारखे पगारदार नौकर आमच्यासंदर्भात बोलत असतील ना, तर त्यांनी त्यांच्या नौकऱ्या कराव्यात. हे सांगावे की, सामनाचे संपादक पद मी सोडले आहे. मला भुंकायसाठी ठेवले आहे आणि तुम्ही भुंकत राहा. तुमच्या भुंकण्याने महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही. आम्ही मजबुतीने काम करत आहोत. म्हणून आमच्या नादी आता लागू नका."

आणखी काय म्हणाले होते राऊत? - नाशिकमध्ये पत्रकारांसोबत बोलताना राऊत यांनी म्हटले होते, की जर तुम्हाला स्वाभिमान असेल. ज्या स्वाभिमानाच्या मुद्द्यावर तुम्ही शिवसेना सोडली म्हणता मग आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला? कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर, सरकारवर थुंकतोय. 3 महिन्यापूर्वी क्रांती केली म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता क्रांती करावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरू आहे. तुमच्या क्रांतीची वांती झाली का? असेही त्यांनी म्हटले होते.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदे