शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'मातोश्री'वरुन आदेश आल्यास महाराष्ट्रात...; शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 11:23 IST

शिवसेनेसाठी संजय राऊत आक्रमकपणे लढाई करत होते. आमचा संविधानावर विश्वास आहे. या देशातील न्याययंत्रणेवर लोकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे असं सुषमा अंधारे यांनी सांगितले.

मुंबई - पक्षासाठी छातीचा कोट करून ईडी, सीबीआयशी लढणारे, लढाऊ स्वाभिमानी बाणा जपणारे संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई सूडबुद्धीनेच केली आहे. आमचा सनदशीर लढाईवर विश्वास आहे. सकाळी ६ पासून सुरू झालेल्या कारवाईला संपूर्ण सहकार्याची भूमिका घेतली. परंतु याचा अर्थ शिवसेना शांत बसणाऱ्यांपैकी आहे असं नाही. कारण मातोश्रीवरून आदेश निघाल्यास महाराष्ट्रात काय वातावरण होईल यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही असा इशारा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला आहे. 

सुषमा अंधारे म्हणाल्या की,  शिवसेनेसाठी संजय राऊत आक्रमकपणे लढाई करत होते. आमचा संविधानावर विश्वास आहे. या देशातील न्याययंत्रणेवर लोकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे. संजय राऊतांच्या पाठिशी संपूर्ण पक्ष आहे. आम्ही ही लढाई जिंकणारच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा अखंड महाराष्ट्रावर यापुढेही असाच फडकत राहणार आहे. आम्ही शिवसैनिक संजय राऊतांसाठी लढत राहणार आहे असं त्यांनी सांगितले. 

संजय राऊतांची संपत्ती किती?मिळालेल्या माहितीनुसार, बँकेत संजय राऊतांच्या नावे बऱ्याच एफडी आहेत. शिवाय मुंबईसह अलिबागमध्येही त्यांच्या आणि पत्नीच्या नावे भूखंड, फ्लॅट असल्याची नोंद आहे. संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी नामनिर्देशन अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रावर आपली मालमत्ता, संपत्ती जाहीर केली होती. तेव्हा आपल्याकडे १ लाख ५५ हजार ७७२ रुपये रोकड असल्याचे संजय राऊत यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेय. बँक खात्यात १ कोटी ९३ लाख ५५ हजार ८०९ रुपये असल्याचे राऊतांनी सांगितले होते.

प्रतिज्ञापत्रानुसार, संजय राऊत यांच्याकडे ३ कोटी ३८ लाख ७७ हजार ६६६ रूपयांच्या ठेवी आहेत. २०२०-२१ या वर्षांत २७ लाख ९९ हजार १६९ रूपये कमावले. संजय राऊत यांच्याकडे अलिबागमध्ये जमिनीचे तीन तुकडे त्यांच्या नावावर आहेत. तर त्यांच्या पत्नीच्या नावे पालघरमध्ये ०.७३ एकरची जाग आहे. ही जागा २०१४ मध्ये खरेदी करण्यात आली आहे. सध्या या जागेची किंमत ९ लाख रूपये आहे. संजय राऊत यांच्या नावे दादरमध्ये एक घर आहे. भांडुप आणि आरे मिल्क कॉलनीमध्ये एक एक घर आहे. 

आम्ही त्यांना दाखवूनच देऊसंजय राऊत यांच्यावरील कारवाई हा लोकशाहीचा, विरोधकांचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. जो हिंदूंचा, मराठी माणसाचा आणि शिवसेनेचा आवाज बुलंद करतोय, त्याचाच गळा घोटण्याचा डाव आहे. शेवटच्या क्षणापर्यंत या जुलूमशाहीविरोधात लढत राहू आणि महाराष्ट्राची माती काय असते, तिथला पराक्रम काय असतो, हे दाखवून देऊ, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय