संचालकपदी संजय पाटील

By Admin | Updated: September 18, 2016 04:59 IST2016-09-18T04:59:21+5:302016-09-18T04:59:21+5:30

राज्यातील सांस्कृतिक विभागाच्या सर्वच खात्यांची जबाबदारी ‘अतिरिक्त’ खांद्यांवर देण्यात आली होती.

Sanjay Patil as Director | संचालकपदी संजय पाटील

संचालकपदी संजय पाटील


मुंबई : राज्यातील सांस्कृतिक विभागाच्या सर्वच खात्यांची जबाबदारी ‘अतिरिक्त’ खांद्यांवर देण्यात आली होती. त्यामुळे साहित्य - सांस्कृतिक वर्तुळातून नाराजी व्यक्त होत होती. गेल्या अनेक महिन्यांपासून सांस्कृतिक संचालनालयाचा कार्यभारही प्रभारी अधिकारी सांभाळत होते; आता मात्र ही संचालकाची जबाबदारी पूर्ण वेळेकरिता संजय पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. लवकरच पाटील या पदाचा भार स्वीकारतील.
सोमवारी, १९ सप्टेंबर रोजी संजय पाटील या पदावर रुजू होणार आहेत. सध्या दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सहव्यवस्थापकाची सूत्रे पाटील सांभाळत आहेत. तसेच पु.ल. देशपांडे कला अकादमीच्या प्रकल्प संचालकपदाची धुराही पाटील यांच्याकडे आहे. अजय आंबेकर हे संचालकपदावरून गेल्यानंतर संचालकपदाचा प्रभारी कार्यभार शैलेश जाधव आणि संजय पाटील यांनी सांभाळला होता. तीन वर्षांच्या कालावधीसाठी पाटील सांस्कृतिक संचालनालयाच्या संचालकपदाचा कार्यभार सांभाळतील. (प्रतिनिधी)

Web Title: Sanjay Patil as Director