संजय पाण्डेय यांची बदली रद्द

By Admin | Updated: April 20, 2015 02:41 IST2015-04-20T02:41:53+5:302015-04-20T02:41:53+5:30

वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक संजय पाण्डेय यांची बदली अखेर रद्द करण्यात आली आहे. पाण्डेय यांना वैध मापन शास्त्र विभागाच्या नियंत्रक पदी अपर

Sanjay Pandey's transfer cancellation | संजय पाण्डेय यांची बदली रद्द

संजय पाण्डेय यांची बदली रद्द

मुंबई : वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक संजय पाण्डेय यांची बदली अखेर रद्द करण्यात आली आहे. पाण्डेय यांना वैध मापन शास्त्र विभागाच्या नियंत्रक पदी अपर पोलीस महासंचालक या पदामध्ये श्रेणी उन्नत करून पदोन्नती देण्यात आली आहे.
याआधी पाण्डेय यांची बदली राज्याच्या महिला अत्याचार प्रतिबंध विभागाच्या पोलीस उप महानिरीक्षक पदी पुणे येथे करण्यात आली होती. बिल्डर, सराफा आणि आॅईल माफियांवर केलेल्या कारवाईमुळे ही बदली झाल्याची चर्चा प्रशासनात रंगली होती. ‘लोकमत’नेही या वृत्ताला वाचा फोडली होती. त्यानंतर विधानपरिषदेतही त्याचे पडसाद उमटले होते. नुकतेच पाण्डेय यांनी दूधाची पिशवी थंड करण्याच्या नावाखाली अतिरिक्त पैसे उकळणाऱ्या दुकानांवर धडक कारवाई सुरू केली आहे. दिवसाला शंभरहून अधिक खटले दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे एमआरपीहून अधिक किंमतीने वस्तू विकणाऱ्या दुकानदारांनी त्यांची दहशत घेतली आहे.

Web Title: Sanjay Pandey's transfer cancellation