शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा भाजपाशी पुन्हा 'पंगा', कोकण पदवीधरचं तिकीट माजी महापौर संजय मोरेंना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 14:04 IST

कोकण पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात आता शिवसेनेनंही उडी घेतली आहे. ठाण्याचे माजी महापौर संजय मोरेंना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे.

ठाणे- कोकण पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात आता शिवसेनेनंही उडी घेतली आहे. ठाण्याचे माजी महापौर संजय मोरेंना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपात गेलेल्या निरंजन डावखरेंसमोर शिवसेनेनं आव्हान उभी केल्याची चर्चा आहे. विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणूक 25 जून 2018 रोजी होणार आहे.कोकण पदवीधर मतदारसंघात आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये ठाणे, रायगड जिल्ह्यांनाच उमेदवारीसाठी प्राधान्य मिळाले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे विजयी झाले होते. त्यांची मुदत येत्या 7 जुलै 2018 रोजी संपत आहे. मात्र, यावेळी निरंजन डावखरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमाध्ये प्रवेश केला. कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजपच्या वतीने निरंजन डावखरे यांची शिफारस करण्यात आली आहे.शिक्षक मतदारसंघातील माजी आमदार रामनाथ मोते यांच्या भाजपा प्रवेशामुळे अ‍ॅड. निरंजन डावखरे यांची बाजू मजबूत झाली आहे. माजी आमदार मोते यांना मानणारा मोठा शिक्षक वर्ग आहे. त्यांनी शिक्षक मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले होते. राष्ट्रवादीचे कोकण पदवीधरचे आमदार डावखरे भाजपामध्ये दाखल झाल्याने राष्ट्रवादीकडून डावखरेंना तोडीस तोड ठरेल, अशा उमेदवाराचा शोध घेतला जात आहे.कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासह 4 मतदारसंघाची निवडणूक अधिसूचना 31 मे रोजी निवडणूक आयोगानं जारी केली. 7 जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. 8 जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 11 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. 25 जूनला मतदान व 28 जूनला मतमोजणी होणार आहे. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात 97 हजारांपेक्षा अधिक पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यातील सर्वाधिक मतदार हे ठाणे व रायगड जिल्ह्यांतील आहेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले निरंजन डावखरे यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदारांची नोंदणी केल्याची माहिती पुढे आली आहे. शिवसेना राष्ट्रवादी कॉँग्रेसचेही पदवीधर मतदार या दोन जिल्ह्यांमध्येच आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाthaneठाणे