रजेत वाढ करण्यासाठी संजय दत्तचा अर्ज

By Admin | Updated: January 7, 2015 10:19 IST2015-01-07T10:09:38+5:302015-01-07T10:19:14+5:30

नुकताच चौदा दिवसांच्या संचित रजेवर (फर्लो) बाहेर आलेल्या ्भिनेता संजय दत्तने रजेच आणखी काही दिवसाची वाढ व्हावी यासाठी अर्ज केला आहे.

Sanjay Dutt's application to increase the raj | रजेत वाढ करण्यासाठी संजय दत्तचा अर्ज

रजेत वाढ करण्यासाठी संजय दत्तचा अर्ज

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - बेकायदा शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी येरवडा कारगृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त नुकताच चौदा दिवसांच्या संचित रजेवर (फर्लो) बाहेर आलेला असताना रजेत पुन्हा काही दिवसांची वाढ करावी यासाठी त्याने अर्ज केला आहे. येरवडा कारगृह प्रशासनाने या वृत्तास दुजोरा दिला आहे.
१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांदरम्यान अवैधरित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी संजयला दोषी ठरवण्यात आले असून त्याला कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कारागृहाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक कैद्याला वर्षातून एकदा संचित रजा मिळते. २०१३ साली संजयला संचित रजा मिळाली होती. त्यानंतर २०१४ साली त्याने पुन्हा रजेसाठी अर्ज केला. २४ डिसेंबर रोजी त्याची १४ दिवसांची रजा मंजूर करण्यात आली होती. मात्र या रजेत आणखी काही दिवसांची वाढ करण्यात यावी असा अर्ज त्याने केला आहे.
 

Web Title: Sanjay Dutt's application to increase the raj