मार्च महिन्यात संजय दत्त तुरूंगातून सुटणार?

By Admin | Updated: December 8, 2015 13:41 IST2015-12-08T13:41:21+5:302015-12-08T13:41:34+5:30

बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्त याची मार्च महिन्यात तुरूंगातून सुटका होणार असल्याचे वृत्त आहे.

Sanjay Dutt to be released from jail in March? | मार्च महिन्यात संजय दत्त तुरूंगातून सुटणार?

मार्च महिन्यात संजय दत्त तुरूंगातून सुटणार?

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ८ - मुंबईतील बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्त याची पुढील वर्षी मार्च महिन्यात सुटका होणार असल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो तुरूंगातून बाहेर पडेल. 
मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदा शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी संजयला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र या खटल्याचे कामकाज सुरू असताना त्याने १८ महिने तुरूंगात काढल्यामुळे त्याला साडेतीन वर्षांचा कालावधी तुरूंगाता काढावा लागणार होता. मे २०१३मध्ये संजय दत्तची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. अखेर आता मार्चमध्ये त्याची तुरूंगाची सुटका होणार असल्याचे वृत्त आहे. 

Web Title: Sanjay Dutt to be released from jail in March?