मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरु संजय देशमुख

By Admin | Updated: June 21, 2015 01:38 IST2015-06-21T01:38:33+5:302015-06-21T01:38:33+5:30

मुंबई विद्यापीठाच्या जीवविज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ.संजय देशमुख हे मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू असतील. राज्यपाल तथा कुलपती सी.विद्यासागर राव

Sanjay Deshmukh, the new Vice Chancellor of the University of Mumbai | मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरु संजय देशमुख

मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरु संजय देशमुख

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या जीवविज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ.संजय देशमुख हे मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू असतील. राज्यपाल तथा कुलपती सी.विद्यासागर राव यांनी आज देशमुख यांची नियुक्ती केली.
मावळते कुलगुरू डॉ.राजन वेळूकर ६ जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत. मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरु नियुक्त करण्यासाठी राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती नेमली होती. या समितीने श्निवारी सकाळी कुलगुरुपदासाठी पात्र वाटलेल्या नावांचे पॅनेल राज्यपालांकडे
सादर केले. त्यांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ.देशमुख यांची नियुक्ती केली. त्यांचा
कार्यकाळ ७ जुलैपासून पाच वर्षांसाठी असेल.
१ मे १९६५ रोजी जन्मलेले डॉ.देशमुख यांनी मुंबई विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समधून १९८६ मध्ये एमएस्सी पदवी संपादन केली. १९९० मध्ये त्यांनी वनस्पतीशास्त्रात पीएचडी संपादन केली. १९९० ते ९५ या काळात ते चेन्नईच्या एम.एस.स्वामिनाथन संशोधन केंद्रात वैज्ञानिक कोस्टल सिस्टिम रिसर्च प्रोग्रामचे प्रमुख होते.
१९९५ ते ९९ या काळात ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे प्रधान वैज्ञानिक होते. १९९९ ते २००१ दरम्यान ते मानव साधन विकास संस्थेचे संचालक (कार्यक्रम) होते. तसेच, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये २००१-२००३ या काळात संचालक (संशोधन) होते. ५ जानेवारी २००५ रोजी त्यांची मुंबई विद्यापीठाच्या जीवविज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली.
(विशेष प्रतिनिधी)

Web Title: Sanjay Deshmukh, the new Vice Chancellor of the University of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.