संजय चव्हाण यांचे जात प्रमाणपत्र रद्द

By Admin | Updated: September 27, 2014 05:13 IST2014-09-27T05:13:42+5:302014-09-27T05:13:42+5:30

राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय चव्हाण यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने चव्हाण यांचे जात प्रमाणपत्र बोगस ठरवत ते रद्द केले असल्याचा निर्णय दिला आहे.

Sanjay Chavan's cast certificate revoked | संजय चव्हाण यांचे जात प्रमाणपत्र रद्द

संजय चव्हाण यांचे जात प्रमाणपत्र रद्द

सटाणा (नाशिक) : राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय चव्हाण यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने चव्हाण यांचे जात प्रमाणपत्र बोगस ठरवत ते रद्द केले असल्याचा निर्णय दिला आहे.
जात प्रमाणपत्र प्रकरणी भाजपाचे आमदार उमाजी बोरसे व संजय चव्हाण यांच्यात गेल्या सात वर्षांपासून न्यायालयीन लढाई सुरू होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे तालुक्याचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे चव्हाण यांनी जात प्रमाणपत्र तयार केल्याचा दावा सात वर्षांपूर्वी आमदार बोरसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. गेल्या महिन्यात उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान जात प्रमाण पत्र पडताळणी समितीने अवैध ठरवलेल्या निर्णयाला चव्हाण यांनी स्थगिती अर्ज केला होता. दरम्यान गेल्या आठवड्यात याचिकेवर सुनावणी होवून जात प्रमाणपत्र तयार करण्यासाठी बोगस कागदपत्र सादर केल्याचे सिद्ध झाल्यामुळे चव्हाण यांचे जातप्रमाण पत्र रद्द करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Sanjay Chavan's cast certificate revoked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.