भजन, कीर्तनातून स्वच्छतेचा संदेश
By Admin | Updated: July 22, 2016 19:01 IST2016-07-22T19:01:20+5:302016-07-22T19:01:20+5:30
भजणी मंडळाच्या टाळ- मृदुंगावरील भजन-कीर्तनाने स्वच्छ भारत मिशनच्या पथकाने कोकलगाव येथे स्वच्छतेचा व शौचालय बांधण्याचा संदेश शुक्रवारी दिला.

भजन, कीर्तनातून स्वच्छतेचा संदेश
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 22 - भजणी मंडळाच्या टाळ- मृदुंगावरील भजन-कीर्तनाने स्वच्छ भारत मिशनच्या पथकाने कोकलगाव येथे स्वच्छतेचा व शौचालय बांधण्याचा संदेश शुक्रवारी दिला. यावेळी विद्यार्थी, ग्रामस्थ, भजनी मंडळ व जिल्हा परिषदेच्या पथकाने भव्य स्वच्छता दिंडी काढून जनजागृती केली.
या स्वच्छतेच्या दिंडीतील पालखीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. दिंडीत सहभागी भजनी मंडळ सुध्दा ग्रामगीतेतील श्लोक आपल्या भजनातुन गात होते. लोकांना शौचालय बांधण्याचे व वापरण्याचे आवाहन ध्वनीक्षेपकातुन करण्यात होते. गावातील हनुमान मंदिरापासुन दिंडीला सुरुवात झाली होती. हातात झेंडे, स्वच्छतेचे संदेश देणारे फलक आणि वारकऱ्यांची भगवी टोपी घालुन असलेले दिंडीतील स्वच्छतादुत लोकांना शौचालय बांधा, उघड्यावर शौचास जाऊ नका असे आवाहन करण्यात आले. ही दिंडी संपूर्ण गावाला फेरी मारुन परत हनुमान मंदिराजवळ विसर्जित करण्यात आली. नंतर या दिंडीचे स्वरुप सभेमध्ये करण्यात आले होते. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले.