शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठेवी वर्ग केल्या प्रकरणात शुभम गुप्तांच्या अडचणी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 10:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली -मिरज-कुपवाड महापालिकेच्या विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये असलेल्या २३६ कोटी रुपयांच्या कायम ठेवी मुदतपूर्व काढून ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये असलेल्या २३६ कोटी रुपयांच्या कायम ठेवी मुदतपूर्व काढून खासगी बँकांमध्ये वर्ग करण्यात आल्याप्रकरणी शासनाकडे अहवाल सादर झाला आहे. यामुळे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यांच्याच काळात हे व्यवहार झाल्याने शासन आता कोणती कारवाई करणार, याकडे तक्रारदारांसह येथील सामाजिक संघटनांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या कायम ठेवी पूर्वी कॅनरा बँक, युनियन बँक व बँक ऑफ महाराष्ट्रकडे होत्या. त्यांची मुदत संपलेली नसताना या सर्व ठेवी मोडून खासगी बँकांमध्ये ठेवण्यात आल्या. शहर व नागरिक विकास मंचने त्यावर  आक्षेप नोंदविला होता. राष्ट्रीयीकृत बँकांमधील ठेवी मुदतपूर्व मोडल्यामुळे महापालिकेला एक ते दीड टक्के प्री-मॅच्युअर क्लोझर इंटरेस्ट पेनल्टी लागली. यातून ३ ते ४ कोटींचे नुकसान झाले आहे. हा नागरिकांचा कररूपी पैसा असल्याने याबाबत असा निर्णय का घेतला, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

मुख्य लेखाधिकाऱ्यांचीही ठेवींसंदर्भात चौकशी सुरूमहापालिकेचे मुख्य लेखाधिकारी अभिजीत मेंगडे यांचीही या ठेवी वर्गप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. ठेवी वर्गचा आदेश नेमका कोणी दिला, ही गोष्ट या चौकशीतून बाहेर येण्याची चिन्हे आहेत. शासन आदेशाचे चुकीचे अर्थ लावून ठेवी वर्ग केल्याची बाब समोर आली असल्याने त्यात तत्कालीन आयुक्तांचीही चौकशी होण्याची चिन्हे आहेत. गुप्ता यांच्या काळात झालेल्या अनेक कारभाराची चौकशी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच दिली होती. 

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्र