संगीता बनली ‘स्वच्छतादूत’
By Admin | Updated: November 9, 2014 02:01 IST2014-11-09T02:01:41+5:302014-11-09T02:01:41+5:30
शौचालय बांधण्याकरिता सौभाग्यलेणो विकण्याचे धाडस दाखविणा:या सायखेडा येथील संगीता आव्हाळे यांची जिल्हा प्रशासनाच्या स्वच्छता अभियानाच्या ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

संगीता बनली ‘स्वच्छतादूत’
वाशिम : शौचालय बांधण्याकरिता सौभाग्यलेणो विकण्याचे धाडस दाखविणा:या सायखेडा येथील संगीता आव्हाळे यांची जिल्हा प्रशासनाच्या स्वच्छता अभियानाच्या ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी संगीता आव्हाळे यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. त्या वेळी त्यांनी ही घोषणा केली.
संगीता आव्हाळे यांनी त्यांच्या कृतीतून राज्यासमोरच नव्हे, तर देशभरात एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. शौचालय नसल्याने ग्रामीण भागातील महिलांची कुचंबना होते; मात्र त्याकडे कुटुंबीय दुर्लक्ष करतात. संगीता यांनी या विषयाकडे सर्वाचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कृतीमुळे शौचालयाचे महत्त्व समजून घेऊन, इतर लोकही शौचालय बांधतील, अशी जिल्हा प्रशासनाची अपेक्षा आहे. सत्काराला उत्तर देताना संगीता आव्हाळे म्हणाल्या, की शौचालय नसल्यामुळे सर्वाधिक त्रस व कुचंबना महिलांना सहन करावी लागते. आज अनेक घरातील महिलांकडे सोन्याचे दागिने आहेत; पण त्यांना शौचास बाहेर
जावे लागते. वास्तविक दागिन्यांपेक्षा शौचालय अधिक महत्त्वाचे
आहे. जिल्हा प्रशासनाला स्वच्छता अभियान व शौचालयाविषयी जनजागृती करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाहीही आव्हाळे यांनी दिली. (प्रतिनिधी)