संदीप तटकरे शिवसेनेत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2016 22:10 IST2016-11-06T22:10:02+5:302016-11-06T22:10:02+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचे पुतणे संदीप तटकरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना भवन येथे झालेल्या कार्यक्रमात संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

संदीप तटकरे शिवसेनेत दाखल
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचे पुतणे संदीप तटकरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना भवन येथे झालेल्या कार्यक्रमात संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांचे शेकडे कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल झाले.त्यावेळी केंद्रीय मंत्री अनंत गीते, आमदार भरत गोगावले, आदेश बांदेकर आदी शिवसेना नेते उपस्थित होते.
संदीप तटकरे हे सुनील तटकरे यांचे मुलगे अनिल तटकरे यांचे मुलगे आहेत. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तटकरे कुटुंबातील कलह समोर आला आहे. रोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी संदीप तटकरे यांनी आधीच अर्ज दाखल केला असून, आता शिवसेनेचे पाठबळ लाभल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे. तर सुनील तटकरेंना मात्र आता या निवडणुकीत सत्ता राखण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे.