शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Video - "प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा..."; नव्या गाण्यासह दमदार टिझर, 9 मार्चला 'राजगर्जना'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 12:17 IST

MNS Sandeep Deshpande : नव्या गाण्यासह मनसेच्या वर्धापनदिन सभेचा टिझर जारी करण्यात आला आहे.

9 मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन आहे. नव्या गाण्यासह मनसेच्या वर्धापनदिन सभेचा टिझर जारी करण्यात आला आहे. यादिवशी 'राजगर्जना' घमुणार आहे. "प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा... नवनिर्माण घडवूया... मनसे" या दमदार गाण्याचा टिझर सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी वर्धापन दिनाचा टिझर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यासोबतच 'प्रतीक्षा नऊ मार्चची' असं म्हटलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाजातील काही वाक्य या व्हिडीओच्या सुरुवातीला ऐकायला मिळत आहेत. यामध्ये "महाराष्ट्र लढवय्या आहे. जे जे काही मिळवलं आहे ते आजपर्यंत लढून मिळवलं आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न करू नका. शिवरायाचा तिसरा नेत्र उघडला तर सगळेच भस्मसात व्हाल" असं राज ठाकरे म्हणताना दिसत आहेत. तसेच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे देखील टिझरमध्ये दिसत आहेत. यासोबतच "प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा... नवनिर्माण घडवूया... मनसे" हे गाणं देखील आहे. 

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडत आहेत. दरम्यान, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील गटाला मोठा धक्का बसला आहे. या घडामोडींबाबत एका मुलाखतीमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांना विचारले असता त्यांनी मोठं विधान केलं. महाराष्ट्रात सध्या हे जे काही चालू आहे त्यावर मी 22 तारखेला शिवतीर्थावर गुढीपाडव्यादिवशी सविस्तर बोलणार आहे.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पनवेलमध्ये आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी विविध मुद्द्यांसोबत राज ठाकरेंनी शिवसेनेतील फूट आणि महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीबाबत संक्षिप्त भाष्य केलं. यावेळी मनसेचा एकच आमदार आहे. त्याने पक्ष आणि चिन्हावर दावा केला, तर काय निवडणूक आयोग काय करणार, या अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारलं असता, राज ठाकरे म्हणाले की, काय आहे ना की, म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो. महाराष्ट्रात हे जे काही चालू आहे त्यावर मी 22 तारखेला शिवतीर्थावर गुढीपाडव्यादिवशी सविस्तर बोलणार आहे, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारणSandeep Deshpandeसंदीप देशपांडे