वाळू चोर, ठेकेदारांच्या वादातून जाळपोळ

By Admin | Updated: May 22, 2014 05:19 IST2014-05-22T05:19:03+5:302014-05-22T05:19:03+5:30

निक वाळू चोर फुकट वाळू का भरू देत नाही, म्हणून ठेकेदारांना दमदाटी करून त्रास देण्याच्या कारणावरून त्यांच्यात सुरू असलेल्या वादाचे रूपांतर भांडणात झाले.

Sand thief, fireworks by the contractors' argument | वाळू चोर, ठेकेदारांच्या वादातून जाळपोळ

वाळू चोर, ठेकेदारांच्या वादातून जाळपोळ

पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) : स्थानिक वाळू चोर फुकट वाळू का भरू देत नाही, म्हणून ठेकेदारांना दमदाटी करून त्रास देण्याच्या कारणावरून त्यांच्यात सुरू असलेल्या वादाचे रूपांतर भांडणात झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर स्थानिक वाळू चोरांनी वाळू ठेकेदारांचे एक पोकलेन, दोन जेसीबी, तीन टिप्पर, नऊ मोटार सायकली, लॅपटॉपची मोडतोड करून जाळपोळ केली. हाणामारीत सहा जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा प्रकार बुधवारी दुपाी शेळवे (ता. पंढरपूर) येथे घडला. या प्रकरणी ३८ ग्रामस्थांवर गुन्हा दाखल झाला असून, चौघांना अटक करण्यात आली. तालुक्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी २५ जणांचा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल आहे. शेळवे येथे अधिकृत वाळूसाठा असतानाही स्थानिक वाळू चोर ठेकेदारांना दमदाटी करून वाळू उपसा का करू देत नाही, म्हणून धमकी देत आहेत. वाळू साठ्यावर काम करीत असलेल्या कामगारांना शिवीगाळ करीत वाहनांची मोडतोड तर केलीच, त्याबरोबर जाळपोळही करून ५0 ते ६0 लाख रूपयांचे नुकसान केले आहे. दरम्यान वाळू विक्री करून जमा झालेले २ लाख ६१ हजार रोख रक्कमही या संधीचा फायदा घेऊन स्थानिक वाळू चोरांनी लंपास केल्याची फिर्याद वाळू कामगार कल्याण मारूती कोळी (३४, रा. चळे, ता. पंढरपूर) यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिली. यावरून ३८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. शेळवे येथील नदी पात्रातील वाळू ठेकेदारांनी शासनाला पैसे भरून घेतले, मात्र काही ग्रामस्थ चोरून वाळू उपसा करीत होते. ठेकेदारांनी विरोध केल्यानंतर चोरून वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर चालकांनी ठेकेदारांवर आक्षेप घेताच हा प्रकार घडल्याची चर्चा घटनास्थळावर होती.

Web Title: Sand thief, fireworks by the contractors' argument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.