तलावातील वाळू, मातीचा बेसुमार उपसा

By Admin | Updated: August 3, 2016 01:11 IST2016-08-03T01:11:17+5:302016-08-03T01:11:17+5:30

येथील ब्रिटिशकालीन तलावातील वाळू व मातीउपसा बेसुमारपणे सुरू आहे.

The sand in the pond, the untidy stems of the soil | तलावातील वाळू, मातीचा बेसुमार उपसा

तलावातील वाळू, मातीचा बेसुमार उपसा


शिर्सुफळ : येथील ब्रिटिशकालीन तलावातील वाळू व मातीउपसा बेसुमारपणे सुरू आहे. त्यावर ना महसूल प्रशासनाचे लक्ष, ना पोलीस प्रशासनाचा धाक. यामुळे शिर्सुफळ तलावातील वाळूउपसा व मातीउपसा हा धंदा जोमात सुरू आहे.
शिर्सुफळ तलावातील वाळूउपसा व मातीउपसा दिवसरात्र सुरू आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या महसूल प्रशासनाच्या डोळ्यांत धूळफेक करून हा धंदा जोरात सुरू आहे. या तलावातील वाळू व माती बारामती, दौंड इंदापूर परिसरात वाहतूक सुरू आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या शाळेतील मुलांना तसेच ग्राामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे अपघाताची गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. शिर्सुफळ तलावातील मातीउपशामुळे येथील रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. ऐन पावसाळ्यात या रस्त्यांना खड्ड्यांचे स्वरूप आले आहे. तीन-चार महिन्यांपूर्वी झालेला मळद-­शिर्सुफळ रस्ता व शिर्सुफळ ते आटोळेवस्ती रस्ता पूर्णपणे उखडला आहे. यावर ग्रामस्थांनी किंवा स्थानिक लोकांनी वारवार महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याकडे तक्रारी केल्या. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ग्रामस्थांनी तक्रार केली आहे. प्रशासनाने या वाळूउपशा व मातीउपशावर बंधने आणली नाही तर तीव्र स्वरूपाचे अंदोलन छेडण्यात येईल, असा ग्रामस्थांच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.(वार्ताहर)

Web Title: The sand in the pond, the untidy stems of the soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.