वाळूमाफियांनी तलाठ्यास चालत्या ट्रकमधून फेकले
By Admin | Updated: March 30, 2015 02:36 IST2015-03-30T02:36:45+5:302015-03-30T02:36:45+5:30
वाळूची तस्करी करणारा ट्रक तहसील कार्यालयात घेऊन जाणाऱ्या तलाठ्यास वाळू माफियांनी चालत्या ट्रकमधून ढकलून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी घडली़

वाळूमाफियांनी तलाठ्यास चालत्या ट्रकमधून फेकले
नाशिक : वाळूची तस्करी करणारा ट्रक तहसील कार्यालयात घेऊन जाणाऱ्या तलाठ्यास वाळू माफियांनी चालत्या ट्रकमधून ढकलून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी घडली़
घटनेनंतर चालकाने ट्रकसह पलायन केले, तर दुसऱ्या घटनेत एक ट्रक जप्त करण्यात आला. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अधिकाऱ्यांचे एक पथक शहरातील सर्व्हिस रोडवर, तर दुसरे पथक नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या पाथर्डी भागातील उड्डाण पुलावर तैनात करण्यात आले होते़ सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या विनाक्रमाकांच्या ट्रकमध्ये वाळू होती. अधिकाऱ्यांनी चालकास तहसीलदार कार्यालयात ट्रक जमा करण्यास सांगितले. त्यामध्ये ट्रकमध्ये तलाठी अरुण पाटील स्वत: बसले़ चालकाने ट्रक पकडल्याची माहिती साथीदारांना देऊन बोलावून घेतले़ त्यांच्या साथीदारांनी पाटील यांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली़ चालकाने पुन्हा ट्रक सुरू केला. त्याच्या दोन साथीदारांनी चालत्या ट्रकमधून पाटील यांना ढकलून दिले. पाटील यांच्या उजव्या हाताच्या बोटास व उजव्या पायास गंभीर दुखापत झाली आहे. (प्रतिनिधी)