महसूल कर्मचा-यांवर वाळू माफियांचा हल्ला
By Admin | Updated: January 12, 2015 03:14 IST2015-01-12T03:14:01+5:302015-01-12T03:14:01+5:30
भीमा नदीतून वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर वाळू माफियांनी ट्रक घालण्याचा प्रयत्न केला व धक्काबुक्कीही केली

महसूल कर्मचा-यांवर वाळू माफियांचा हल्ला
चळे (ता. पंढरपूर): भीमा नदीतून वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर वाळू माफियांनी ट्रक घालण्याचा प्रयत्न केला व धक्काबुक्कीही केली. गुरूवारच्या या घटनेप्रकरणी शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी वाळूसह ट्रक जप्त करून एकावर गुन्हा दाखल केला आहे. भीमा नदीतून बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याची माहिती गुरूवारी रात्री तहसीलदार गजानन गुरव यांना मिळाली. त्यांनी तलाठी दत्तात्रय कोताळकर यांना पथकासह घटनास्थळी पाठविले.
पथक घटनास्थळी पोहोचताच जेसीबी चालक पळून गेला तर अन्य वाहने तेथून हलविण्यात आली.
तर कारवाईसाठी सरसावलेल्या कर्मचाऱ्यांवर ट्रक घालण्याचा
प्रयत्न वाळू माफियांनी केला. (प्रतिनिधी)