शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 06:09 IST

महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण, २४ जिल्हे जेएनपीटीशी जोडले, वाढवण बंदरही जोडणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: समृद्धी महामार्ग हा केवळ रस्ता नाही, तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा ‘कॉरिडॉर’ आहे. या महामार्गाने महाराष्ट्राचे इंटिग्रेशन साधले आहे. यातून २४ जिल्हे जेएनपीटीला जोडले जाणार आहेत. तसेच लवकरच वाढवण बंदराशीही त्याची जोडणी दिली जाणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार निरंजन डावखरे, नितीन पवार, सरोज अहिरे, हिरामण खोसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आदी उपस्थित होते.

अंतिम टप्प्याची काय आहेत खास वैशिष्ट्ये ?

५ जुळे बोगदे, ११ किलोमीटर लांबीचे. इगतपुरी येथील ८ किमी लांबीचा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बोगदा. १०० टक्के आगविरोधी यंत्रणा. बोगद्यातील तापमान ६० अंशांवर गेल्यास स्वयंचलित पाण्याची फवारणी सुरू होईल. तापमान ३० अंशांपर्यंत खाली आल्यावर यंत्रणा बंद होईल, इगतपुरी, फूडघर आणि आमणे हे तीन प्रमुख इंटरचेंज, अपघात झाल्यास बचावासाठी जोडबोगदे.

राज्यात कुठून कुठेही फक्त ६-७ तासांत जाता येणार : शिंदे

राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात सहा ते सात तासांत पोहोचता यावे, यासाठी ॲक्सेस कंट्रोल महामार्गाचे जाळे तयार करीत आहोत. याचा सर्वाधिक फायदा मराठवाड्याला होणार आहे. शक्तिपीठ महामार्ग मराठवाड्यासाठी गेमचेंजर होईल. त्यातून शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गामुळे मुंबईहून शिर्डीला ३ तासांत पोहोचता येणार असून, सर्वाधिक फायदा नाशिकला होणार असल्याचे सांगितले.

‘शक्तिपीठ’चे काम लवकरच सुरू होणार

पुढच्या टप्प्यात शक्तिपीठ महामार्गाचे काम हाती घ्यायचे आहे. हा महामार्ग मराठवाड्याचे आर्थिक चित्र बदलणारा ठरेल. त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी जाहीर केले. समृद्धी महामार्गाचे काम सुरू केले तेव्हा अनेकांना हा प्रकल्प होऊ शकत नाही, असे वाटले होते. मात्र, रेकॉर्ड ब्रेक वेळेत भूसंपादन केले. आमच्या काळात हा महामार्ग सुरू झाला याचा आनंद आहे. २०१४ मध्ये जे स्वप्न पाहिले होते, त्याची आज पूर्तता होत आहे याचा आनंद आहे, असेही त्यांनी नमूद केले.

पर्यावरण संवर्धनासाठी यंदा १० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. तर पुढील चार वर्षे दर वर्षाला २५ कोटी झाडे लावली जाणार आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. जुन्या नागपूर-मुंबई मार्गावरून नागपूरहून मुंबईकडे येण्यास १७ ते १८ तास लागतात. समृद्धीने हाच प्रवास आता आठ तासांत होईल.

  • ६१,००० - कोटी एकूण खर्च
  • ७०१ किमी - एकूण लांबी
  • ८ तास - प्रवासाचा कालावधी
  • १०० - विशिष्ट संरचना वन्यजीवांसाठी
  • १८० - ओव्हरपास आणि
  • २२४ - अंडरपास पादचाऱ्यांसाठी
  • ५९ - ओव्हरपास आणि
  • २२९ - अंडरपास वाहनांसाठी
  • २५ - इंटरचेंजमुळे इतर ठिकाणी जाता येणार
  • ८ - ओव्हरपास
  • ९२ - अंडरपास निर्मिती देशात प्रथमच
  • ३२ - मुख्य पूल
  • ३१७ - लहान पूल

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार