समीरची सुनावणी २२ जानेवारीला
By Admin | Updated: January 14, 2016 00:22 IST2016-01-14T00:22:00+5:302016-01-14T00:22:00+5:30
ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित समीर गायकवाड याच्या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी २२ जानेवारीपर्यंत

समीरची सुनावणी २२ जानेवारीला
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित समीर गायकवाड याच्या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी २२ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. दरम्यान, समीरच्या विरोधातील खटला कोल्हापूर बाहेर वर्ग करावा, अशी याचिका त्याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी होत आहे. (प्रतिनिधी)