शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

त्याच पिडीता पुन्हा पुन्हा.... सेक्स रेकेटचे दुष्टचक्र

By admin | Updated: July 31, 2016 19:51 IST

गोव्यात आॅनलाईन व आॅफ लाईन सेक्स रेकेट्स चालविणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई जोमात सुरू आहे. विशेषत: गुन्हा अन्वेषण विभागाकडून वारंवार छापे टाकण्यात आले आहेत

वासुदेव पागीपणजी, दि. ३१ : गोव्यात आॅनलाईन व आॅफ लाईन सेक्स रेकेट्स चालविणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई जोमात सुरू आहे. विशेषत: गुन्हा अन्वेषण विभागाकडून वारंवार छापे टाकण्यात आले आहेत. छाप्यातून ज्या युवतींची सुटका करण्यात आली वगैरे म्हटले जाते त्याच युवतींची यापूर्वीही सुटका करण्यात आली असल्याच्या नोंदी पोलीसांच्या डायरीतही मिळत आहेत आणि त्यांची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या गोमेकॉतही त्यांच्या पूर्वी चाचणी घेतल्याच्या नोंदी मिळत आहेत.

राज्यात वेश्या व्यसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे वारंवार होणाऱ्या छाप्यावरूनही स्पष्ट होत आहे. या छाप्यातून दलालांना पकडले जाते तर वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या महिलांना ताब्यात घेतले जाते. त्या वेश्या व्यवसायासाठी त्या ठिकाणी असल्या तरी कायद्याने त्यांना अटक करता येत नाही. त्यांना दलालांकडून फसवून किंवा प्रलोभने दाखवून आणले जात असल्यामुळे त्यांना पीडितांच्या यादीत गणले जाते. हा कायदा महिलांच्या भल्यासाठीच करण्यात आला होता. त्यांना जीवनाची नवीन सुरूवात करण्याची संधी मिळावी किंवा पुनर्वसन व्हावे हा त्यामागे हेतू होता, परंतु एखादी सुटका करण्यात आलेल्या महिलेची कालांतराने पुन्हा पुन्हा सुटका करावी लागते त्यावेळी त्यांची सुटका करणारे पोलीसही अचंब्यात पडत आहेत.

गोमेकॉतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी ज्या महिलांची वेश्या दलालांच्या तावडीतून सुटका केली म्हणून गोमेकॉत वैद्यकीय चाचणीसाठी आणले गेले त्यापैकी अनेक महिला या पहिल्या वेळी आलेल्या नसतात. पाच सहा वर्षांत एक पेक्षा अधिकवेळा त्यांच्यापैकी बहुतेकांच्या वैद्यकीय चाचण्या केलेल्या असतात. गोमेकॉतील एका अधिकाऱ्याकडून ही माहिती देण्यात आली. गोव्यात गोमेकॉत त्यांच्या एक पेक्षा अधिकवेळा नोंदी सापडत असतील तर इतर राज्यातील इस्पितळातही तशा नोंदी सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काही महिलांची पोलिसांच्या फायलीतही नोंद असल्याचे आढळून आले आहे. सुटका करण्यात आलेल्या महिला प्रत्येकवेळी आपली नावे बदलत असल्याचेही आढळून आले आहे. ही सर्व माहिती असूनही पोलिसांना अशा महिलांच्या बाबतीत पिढीत म्हणूनच व्यवहार करावा लागतो अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या कायद्याचा सर्रासपणे दुरुपयोग केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

केवळ पीडीत महिलाच नव्हे तर ज्या दलालांना अटक केली जात आहे त्याच दलालांना कधी कधी दुसऱ्यांदा अटक करण्यात आल्याचेही पोलिसांच्या नजरेस आलेले आहे. अशा दलालांनी दुसऱ्यावेळी दुसरेच नाव सांगितलेले असते. त्यांच्याकडे ओळखपत्रेही ते जवळ बाळगत नाहीत.