संभाजीराजे एक नंबरचे खासदार, सतेज पाटील यांनी केले कौतुक

By Admin | Updated: September 2, 2016 22:27 IST2016-09-02T22:27:16+5:302016-09-02T22:27:16+5:30

तुमच्या रुपाने कोल्हापूरचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी कोल्हापूरला हक्काचा खासदार मिळाला असं आमदार सतेज पाटील यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे कौतुक केले

SambhajiRaje, a number MP, Satjeet Patil appreciated | संभाजीराजे एक नंबरचे खासदार, सतेज पाटील यांनी केले कौतुक

संभाजीराजे एक नंबरचे खासदार, सतेज पाटील यांनी केले कौतुक

>- ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 2 - संभाजीराजेराजे कोल्हापूरच्या जनतेच्या मनातील  खरे एक नंबरचे  खासदार तुम्हीच आहात ..कोण किती प्रश्न विचारते, यापेक्षा तुम्ही  कोल्हापूरचे आणि जनतेचे  प्रश्न सोडवणार याची आम्हाला खात्री आहे. तुमच्या रुपाने कोल्हापूरचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी कोल्हापूरला हक्काचा खासदार मिळाला, अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे कौतुक केले. निमित्त होते..एस पी एन नेटवर्कच्या  विधायक गणेशोत्सव  बक्षीस वितरण समारंभाचे.
 
खासदार संभाजीराजे म्हणाले 'माझी आणि सतेज पाटील यांची  शाळेपासूनची   दोस्ती आहे. खासदार झाल्यावर पहिल्यांदा वाड्यावर सत्कारासाठी बंटी पाटीलच आले . मी जास्त बोलण्यापेक्षा काम करून दाखवतो. लोकसभेतील पराभव हा अपयश हि यशाची पहिली पायरी म्हणून स्वीकारला आणि काम करत गेलो . रायगडावरील शिवराज्याभिषेकातील टाळ्यांचा आवाज दिल्लीत पोहोचला. आज कोल्हापुरातील कार्यक्रमात माझ्या भाषणाला  शिट्टयांची दाद मिळाली, या योग पहिल्यांदाच आला आहे.आणि मला याचा आनंद वाटतोय', अशा भावना व्यक्त केल्या.
 

Web Title: SambhajiRaje, a number MP, Satjeet Patil appreciated