शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

“शिवसेना-NCPतील फूट जनतेच्या हितासाठी झाली का? आमच्या आयुष्याचा खेळ केला”: संभाजीराजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 17:18 IST

Sambhaji Raje Chhatrapati News: शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक, राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी ब्रूद्रुक असे झाले. या सगळ्यांनी फक्त जनतेचा छळ केला, अशी टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

Sambhaji Raje Chhatrapati News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडी जागावाटपावर खल करताना दिसत असून, दुसरीकडे या दोन्हींना पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी उघडण्यात आली आहे. राजू शेट्टी, बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपती यांनी ही आघाडी केली असून, विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यातच आता शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील झालेली फूट ही जनतेच्या हितासाठी केली का, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला. 

तिसऱ्या आघाडीच्या परिवर्तन महाशक्ती मेळाव्यात बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील सद्य परिस्थितीवर भाष्य करताना महायुती आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. गड किल्ल्यांना ७५ वर्षांत किती पैसे दिले सांगा, माझे  चलेंज आहे. ३५० गड कोट किल्ल्यांचे काय केले? नुसते शिवाजी महाराजांचे नाव घेता , रायगड अध्यक्ष झालो म्हणून काही करू शकलो, असे संभाजीराजे छत्रपती यांनी नमूद केले. तसेच ७५ वर्षात फक्त १ कोटी खर्च. राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले होते. १२ डिसेंबर रोजी सांगितले की, योग्य पद्धतीने काम झाले नाही. मात्र तेव्हा कुणी काही बोलले नाही. विरोधक गप्प बसले होते, असे संभाजीराजे म्हणाले.

लोकांच्या प्रश्नासाठी नाही तर स्वार्थासाठी खुर्द आणि बुद्रुक झाले 

भाजपा विद्वान असल्याच्या नादात पक्षांचे विभाजन करत होती. काँग्रेसच काही वेगळेच सुरू होते. एनसीपी कुणाची , शिवसेना कुणाची  सगळा गोंधळ होता. गाव छोटी मोठी असतात त्याला खुर्द आणि बुद्रुक  म्हणतात. तसे एनसीपी, शिवसेनेचे झाले आहे. शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक, राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी ब्रूद्रुक असे झाले. हे का जनतेच्या हितासाठी झाले का? हे लोकांच्या प्रश्नासाठी खुर्द आणि बुद्रुक झाले नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी हे असे झाले. या सगळ्यांनी फक्त जनतेचा छळ केला. तुम्ही आमच्या आयुष्याचा खेळ केला, अशी टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

दरम्यान, आम्ही जात धर्माच्या नावाने एकत्र आलो नाही, धर्मनिरपेक्षता घेऊन आम्ही मैदानात आलो. महाराष्ट्र घडवण्यासाठी हे परिवर्तन गरजेचे आहे म्हणून आम्ही मैदानात उतरलो. महाराष्ट्राचा सातबारा आपल्या बापाचा आहे असे सगळे सुरु आहे, मात्र हा सातबारा कष्ट करी जनतेचा आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीPoliticsराजकारण