शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

Sambhaji Brigade- Shivsena Alliance: दुहीचा शाप कायम घात करत आलाय, आपण त्यालाच गाडून टाकू; संभाजी ब्रिगेडच्या साथीनंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 13:44 IST

महाराष्ट्राच्या राजकारणाला आज वेगळी कलाटणी देणारी युती झाली झाली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात शुक्रवारी मोठी घडामोड दिसून आली. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केल्यानंतर आता संभाजी ब्रिगेडनं शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडनं युती करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ही युती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेली नाही असं स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं.

“लढवय्या सहकाऱ्यांचे स्वागत आणि अभिनंदन. फक्त महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण देशात प्रादेशिक अस्मिता, प्रादेशिक पक्ष संपवण्याचे काम सुरू आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयात आमचा लढा सुरू आहे, हा फक्त शिवसेनेचा लढा नाही. हा लोकशाहीचा लढा आहे,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जो विचार करुन आपण सोबत आला आहात, तो विचार म्हणजे संविधान वाचवण्यासाठी सोबत आलो आहोत. आपण शिवप्रेमी आहोत, आपल रक्त एकच आहे. एकत्र येऊन आपल्याला नवीन इतिहास घडवायचा असल्याचेही ते म्हणाले.

“आजवरचा जो इतिहास आहे मग तो मराठी माणसांचा म्हणा, मराठ्यांचा म्हणा दुहीचा हा गाढत आलेला आहे. आपण एकत्र येऊन एक नवा इतिहास घडवू, दुहीच्या शापालाच गाडून टाकू. दुहीचा शाप आजवर आमचा घात करत आला. साक्षीपुरावे गोळा करण्याचे दिवस नाही, पण असं म्हटलं जातं की औरंगजेबानं सांगितलं होतं की मराठ्यांना जगाच्या पाठीवर काही तोड नाही. पण या भूमीत दुहीची बीजं खडकावर जरी फेकली तरी ती इतकी रुजतात किंवा फोफावतात की हा हा तमाम दौलत तबाह करून टाकतात. हे आपल्या शत्रूलाही कळलं होतं. आमची जी काही भूमिका रोखठोक आहे म्हणून एकत्र आलो आहोत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युतीमहाराष्ट्राच्या राजकारणाला आज वेगळी कलाटणी देणारी युती झाली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले आहेत. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज या युतीची घोषणा केली. संयुक्त मेळावे घेण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडने केले आहे. गेल्या दोन अडीज वर्षांच्या काळात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना चांगले लोकहित पाहिले. चांगले निर्णय घेतले. आता लोकशाही धोक्यात आलेली आहे. छोटे पक्ष, संघटना जर वाचवायच्या असतील तर एकत्र यावे लागले, यावर आमचे एकमत झाले आहे, असं संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडMaharashtraमहाराष्ट्र