शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

संभाजी भिडे समर्थकांचा सांगलीसह राज्यात मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 08:53 IST

श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ आज सांगलीसह राज्यभरात सन्मान महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

सांगली : श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ आज सांगलीसह राज्यभरात सन्मान महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरेगाव-भीमा दंगलीत सहभागाबद्दल संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र संभाजी भिडे यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही असा दावा करत शिवप्रतिष्ठानने सांगलीसह राज्यभरात सन्मान मोर्चाचे आयोजन केले. हा मोर्चा राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार आहे. मात्र, दुसरीकडे मुंबईत भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र या मोर्चाला परवानगी दिलेली नाही. मात्र आझाद मैदानात सभेची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, पुण्यात सुरक्षेचे कारण पुढे करत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतही सकाळी 10 वाजता ओंकारेश्वर मंदिराजवळील नदीपात्रात जमून, लालमहालापर्यंत चालत जाण्याचा निर्णय श्री शिवप्रतिष्ठानने केला आहे.सांगलीत सकाळी दहाच्या सुमारास कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून या मोर्चाला प्रारंभ करण्यात येणार आहे. राम मंदिर चौक, काँग्रेस भवन, आझाद चौकमार्गे मोर्चा स्टेशन चौकात जाणार आहे. त्याठिकाणी निवेदन वाचन झाल्यानंतर मोर्चाचा समारोप होणार आहे. 

 भिडे गुरुजींना ‘क्लीन चिट’कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे गुरुजींचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा कुठलाही पुरावा हाती लागलेला नाही. शिवाय, ज्या महिलेने त्यांच्याविरोधात तक्रार केली होती तिनेच आपण भिडे गुरुजींना ओळखत नसल्याची साक्ष दिली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.  तथापि, गुरुजींविरोधात काही नवे पुरावे आले असून त्याचा तपास करून आठ दिवसांत पुढील कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीSangliसांगली