शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी भिडेंना अटक करा, आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 06:30 IST

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणानंतर धुळे येथील जाहीर कार्यक्रमात संविधानविरोधी वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांना

मुंबई : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणानंतर धुळे येथील जाहीर कार्यक्रमात संविधानविरोधी वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करण्याची मागणी करत भीम आर्मीने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. देशाच्या घटनेबाबत वादग्रस्त वक्तव्य करून संविधानाचा अपमान भिडे यांनी केल्याचा भीम आर्मीचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना अटक केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भीम आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कांबळे यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात दिला आहे.

कांबळे म्हणाले की, भारतीय घटनेचा अपमान केल्यानंतरही सरकारकडून भिडेंवर कारवाई केली जात नाही. कोरेगाव भीमा प्रकरणातही भिडेंचे संबंध असल्याचे समोर आले आहे. तरीही सरकारकडून त्यांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात आता संविधानावर अविश्वास व्यक्त करताना घटनेचा अपमान करणारे वक्तव्य भिडे यांनी करून नव्या वादाला फोडणी दिली आहे. त्यामुळे समाजातील कायदा व सुव्यवस्था राखायची असेल, तर भिडेंना तत्काळ अटक करण्याची मागणी भीम आर्मीने केली आहे. येत्या आठवड्याभरात भिडेंना सरकारने अटक केली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कांबळे यांनी दिला आहे.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीBhima-koregaonभीमा-कोरेगाव