सांबरकुंड धरण पूर्ण करणारच
By Admin | Updated: March 6, 2017 03:21 IST2017-03-06T03:21:03+5:302017-03-06T03:21:03+5:30
अलिबाग तालुक्यातील गेले अनेक वर्षे रखडलेले सांबरकुंड धरण येत्या तीन वर्षांत पूर्ण केले जाईल

सांबरकुंड धरण पूर्ण करणारच
रेवदंडा : अलिबाग तालुक्यातील गेले अनेक वर्षे रखडलेले सांबरकुंड धरण येत्या तीन वर्षांत पूर्ण केले जाईल, त्यामुळे येथे दुबार भातशेती करता येईल व कृषी पर्यटन वाढेल, असा विश्वास रेवदंडा येथे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
येथील मारुती आळीतील प्रकाश दांडेकर यांच्या निवासस्थानी जलसंपदा मंत्री महाजन यांचे
कार्यक र्त्यांनी स्वागत केले. यावेळी ते बोलत होते. खारबंदिस्ती योजनेला चार पट पैसे वाढवून दिले असता खारबंदिस्ती न झाल्याने शेती नापीक बनली आहे असा प्रश्न केला असता याबाबत चौकशी केली जाईल, असे सांगितले. आघाडीचे सरकार असताना जलसंपदा खात्यात जो भ्रष्टाचार झाला त्याबाबत सखोल चौकशी सुरू असून आरोपींना लवकरच शिक्षा होईल, असे सांगितले.
याप्रसंगी अलिबाग तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष हेमंत दांडेकर, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य उदय काठे, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र म्हात्रे तसेच तालुक्यातील भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
>डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट
रेवदंडा : येथील मारुती आळीतील ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला असल्याबद्दल रविवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला, त्याप्रसंगी धर्माधिकारी कुटुंबीय उपस्थित होते.