उंडेगावकर महाराजांचा खडर्य़ात समाधी सोहळा
By Admin | Updated: September 2, 2014 02:16 IST2014-09-02T02:16:00+5:302014-09-02T02:16:00+5:30
खर्डा येथील ह.भ.प. संत सद्गुरू सीताराम महाराज उंडेगावकर यांचा अंत्यविधी खर्डा येथील सीतारामगडावरच करावा, असे आदेश पुण्याच्या प्रथम वर्ग न्यायालयाने दिले आहेत.

उंडेगावकर महाराजांचा खडर्य़ात समाधी सोहळा
अहमदनगर/खर्डा : खर्डा येथील ह.भ.प. संत सद्गुरू सीताराम महाराज उंडेगावकर यांचा अंत्यविधी खर्डा येथील सीतारामगडावरच करावा, असे आदेश पुण्याच्या प्रथम वर्ग न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आज (मंगळवार) सकाळी 11 वाजता खर्डा येथे समाधी सोहळा होईल.
उंडेगावकर महाराजांचा समाधी सोहळा आमच्या भागात करावा, अशी भूमिका खर्डा व उंडेगाव (ता. उंडेगाव, जि. उस्मानाबाद) येथील भाविकांनी केली होती. खर्डा येथील उंडेगावकर महाराजांचे शुक्रवारी रात्री पुण्यात निधन झाले, त्यानंतर चार दिवसांपासून समाधी सोहळ्याचा वाद सुरू होता. मृतदेह कोणाच्या ताब्यात द्यायचा, याबाबत कोणतेही वाद किंवा आदेश नाहीत. नानासाहेब तागड यांच्यापेक्षा खर्डा येथील भाविकांना अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार मोठा आहे, असा युक्तिवाद अॅड. काकासाहेब खाडे यांनी केला.
सीताराम गडावर समाधी सोहळा करावा, अशी इच्छा उंडेगावकर महाराजांनी व्यक्त केली होती़ त्यामुळे भाविकांनी सढळ हाताने देणगी देत गडाचे काम सुरू केल़े न्यायालयाच्या निर्वाळ्यानंतर महाराजांचे पार्थिव खर्डेकरांना मिळाल़े खर्डा गावासह परिसरातील व्यापारी तीन दिवस व्यवहार बंद ठेवून न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत होत़े (प्रतिनिधी)
अंत्यदर्शनासाठी गर्दी
सीताराम महाराजांचे पार्थिव सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून दर्शनासाठी खर्डा येथे ठेवण्यात आल़े दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंगळवारी सकाळी 7 वाजेपासून समाधी सोहळ्याची विधीवत पूजा सुरू होईल.