रेषांमधून डोकावणाऱ्या व्यंगाला सलाम...!

By Admin | Updated: May 5, 2016 21:03 IST2016-05-05T21:03:17+5:302016-05-05T21:03:17+5:30

एरवी दररोज आपण वृत्तपत्रांमध्ये व्यंगचित्रांचा आनंद घेत असतो. त्यावर खळखळून हसतो आणि व्यंगचित्रकाराच्या कल्पकतेला सलाम ठोकतो.

Salute to the satire that looks at the lines ...! | रेषांमधून डोकावणाऱ्या व्यंगाला सलाम...!

रेषांमधून डोकावणाऱ्या व्यंगाला सलाम...!

एरवी दररोज आपण वृत्तपत्रांमध्ये व्यंगचित्रांचा (कार्टून) आनंद घेत असतो. त्यावर खळखळून हसतो आणि व्यंगचित्रकाराच्या (कार्टुनिस्ट) कल्पकतेला सलाम ठोकतो. परंतु आजचा दिवस मात्र खास व्यंगचित्रकारांसाठीच आहे. साऱ्या जगात ५ मे हा ‘व्यंगचित्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. कारण ५ मे १८९५ या दिवशी जोसेफ पुलित्झर यांच्या न्यूयॉर्क वर्ल्डमध्ये हास्य आणि व्यंगाची उधळण असलेल्या ‘द येलो कीड’ या कॉमिकचे प्रकाशन झाले होते. त्याचे निर्माते होते रिचर्ड एफ.आऊटकल्ट. ‘द येलो कीड’ला वर्तमान युगातील कार्टुनचा प्रारंभ मानला जातो. त्यामुळेच आजचा हा दिवस व्यंगचित्रकारांच्या कुंचल्यातून रेखाटल्या गेलेल्या रेषांमधील व्यंगाच्या प्रखर तितक्याच बोचऱ्या अभिव्यक्तीला सलाम करण्याचा दिवस आहे.

लोकमत समूहाने व्यंगचित्रांची महती आणि त्याच्या शक्तीची नेहमीच प्रशंसा केली आहे. समूहाद्वारे प्रकाशित मराठी दैनिक लोकमत, हिंदी दैनिक लोकमत समाचार आणि इंग्रजी दैनिक लोकमत टाइम्स ही तीनही वृत्तपत्रे देशातील दिग्गज व्यंगत्रिकारांची व्यंगचित्रे आपल्या पानावर असावीत यासाठी सदैव प्रयत्नशिल असतात. लोकमत समूह हा भारतातील असा एकमेव समूह आहे ज्याने महान कार्टुनिस्ट आर.के. लक्ष्मण यांची सदाबहार व्यक्तिरेखा ‘कॉमन मॅन’ला एक दिवसासाठी आपल्या वृत्तपत्राचे ‘गेस्ट एडिटर’बनविले होते. दिवस होता ५ फेब्रुवारी २०१२. हा एक अत्यंत आगळावेगळा प्रयोग होता.
आर.के. लक्ष्मण यांना लोकमत समूहाबद्दल नेहमीच आत्मीयता होती. लोकमत टाइम्सच्या पहिल्या अंकासाठी (२१ आॅक्टोबर १९९२) त्यांनी शुभेच्छांसह एक कार्टुन भेट दिले होते. आर.के. लक्ष्मण आज आमच्यात नाहीत. परंतु त्यांची व्यंगचित्रे मात्र आजही अजरामर आहेत. मुळात व्यंगचित्रकाराचे हेच वैशिष्ट्य आहे. तो वर्तमानात ज्या व्यंगचित्राची निर्मिती करतो त्यात भविष्याचे कथन दडून असते.
व्यंगचित्रकार दिनानिमित्त लोकमत समूहातर्फे आपल्या वाचकांना व्यंगचित्रकारांच्या या अनोख्या जगाची सफर घडविण्यात येत आहे. आज हयात नसलेले त्याचप्रमाणे ज्यांचे कुंचले सतत सक्रिय आहे अशा सर्व व्यंगचित्रकारांना जाणून घेता येणार आहे.व्यंगचित्रकारदिनी सर्व व्यंगचित्रकारांना लोकमत समूह सलाम करतो. विशेष पान....

Web Title: Salute to the satire that looks at the lines ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.