सलमानच्या चित्रपटाला चोरांचा फटका

By Admin | Updated: July 1, 2015 02:06 IST2015-07-01T02:06:20+5:302015-07-01T02:06:20+5:30

सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी वापरण्यात येणारे मौल्यवान कॅमेरे, ८ हजार ५०० रुपयांची रोकड असा ४ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात

Salman's film gets stolen | सलमानच्या चित्रपटाला चोरांचा फटका

सलमानच्या चित्रपटाला चोरांचा फटका

खालापूर : सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी वापरण्यात येणारे मौल्यवान कॅमेरे, ८ हजार ५०० रुपयांची रोकड असा ४ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने एकच खळबळ उडाली होती.
या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. रायगड गुन्हे अन्वेषण विभागाकडे या गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आल्यानंतर चोरी झालेल्या मोबाइलच्या लोकेशनवरून पोलिसांनी या गुन्ह्यातील प्रमुख आरोपीला अटक केली असून, अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Salman's film gets stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.