सलमान खानची मुंबई विमानतळावर 'दबंग'गिरी
By Admin | Updated: July 18, 2016 14:21 IST2016-07-18T14:21:39+5:302016-07-18T14:21:39+5:30
बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खानला मुंबई विमानतळावर रोखण्यात आल्याने त्याने कर्मचा-यांशी वाद घालत राग व्यक्त केला

सलमान खानची मुंबई विमानतळावर 'दबंग'गिरी
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 18 - नेहमी वादाच्या भोव-यात अडकणारा बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खानने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. दिल्लीला जाण्यासाठी निघालेला सलमान खान मुंबई विमानतळावर उशीरा आल्याने त्याला रोखण्यात आलं होतं. पण आपण उशिरा येऊनही नियमाप्रमाणे वागणा-या कर्मचा-यांशी सलमनाने हुज्जत घालत आपला राग व्यक्त केला.
सलमान खान विस्तारा एअऱलाइन्सने दिल्लीला चालला होता. दिल्लीमधील एका कार्यक्रमाला त्याला उपस्थित राहायचं होतं. पण उशिरा पोहोचल्याने त्याला रोखण्यात आलं. यानंतर रागावलेल्या सलमान खानने आपण पुन्हा कधीच विस्तारा एअऱलाइन्सने प्रवास करणार नाही असा निर्णयही सुनावला. यानंतर विमानतळावरील अधिका-यांनी परिस्थिती सावरत सलमानला वेटिंग रुममध्ये बसवलं. आणि एअर इंडियाच्या दिल्लीला जाणा-या विमानाने त्याच्या प्रवासाची सोय करुन दिली.